कासार शिरंबे येथील छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुलमध्ये घडतेय पैलवानांची फौंज.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
२७-०४-२०२५
कराड तालुका पैलवानांचा तालुका म्हणुन ओळखला जातो. खाशाबा जाधव हे एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यासाठी ते प्रसिद्ध होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. तर अकोला येथे १९९४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कराड तालुक्यातील आटके गावचे सुपुत्र कै. संजय पाटील यांनी महाराष्ट्र केसरी किताब जिंकून कराड तालुक्यात मानाचा तुरा रोवला होता.
कासार शिरंबे ता. कराड येथे छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल गेली ७ वर्षे पैलवानांची फौज घडवण्याचे काम पैलवान संभाजी कळसे व पैलवान भगवान यादव करत आहेत. अथक परिश्रम घेऊन पैलवान घाडवण्याचे काम करत आहेत.
या संकुलामध्ये दरवर्षी उन्हाळी शिबीर भरवले जाते. या वर्षी २८ एप्रिल ते २३ मे पर्यंत शिबीर भरवण्यात आले आहे. यामध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. पहाटे ४ वाजल्यापासून व्यायामास सुरुवात केली जाते. त्यानंतर पहेलवानांची अंघोळ, नाष्टा ,जेवण तसेच दुपारी आराम ४ वाजल्यापासून कुस्तीचा सराव व सायंकाळी जेवण असा दिनक्रम चालतो. उन्हाळी सुट्टी लागली की बरेच पालक आपल्या पाल्याला कुस्ती संकुलात पाठवत असतात. त्यामुळे मुलांची शरीरयष्टी योग्य वयात बनली जात आहे. छोटे पैलवान आज ना उद्या छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल व गावचे नाव नक्की उज्वल करतील हे नाकी!