सामाजिक

उलवे शहरात अग्निशमन दलाची भव्य रॅली!

सिडको विद्यमाने अग्निशमन सेवा सप्ताह अंतर्गत उलवे शहरात भव्य वाहन रॅलीद्वारे जनजागृती.

झुंजार टाईम्स 

महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी 

 

अग्निशमन सेवा सप्ताह २०२५ निमित्त नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने उलवे अग्निशमन दल व सिडको अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० एप्रिल रोजी सेक्टर-२०,२१,२,९,८,१७,१८,१५,१९. मुख्य रस्तयानेअशी भव्य अग्निशमन वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीची सकाळी १०:०० वाजता उलवे अग्निशमन केंद्र येथून सुरूवात करण्यात आली. उलवे अग्निशमन अधिकारी प्रतिक दिपक शिंदे, अग्निशमन प्रणेते कृष्णा अमरसिंह राठोड, अग्निशमन प्रणेते वैभव खंडागळे तसेच पुरुष अग्निशमन कर्मचाऱ्यांनी या रॅलीचे प्रतिनिधित्व केले.

उलवे अग्निशमन केंद्र येथून सुरुवात झालेली ही रॅली सेक्टर-15,17,18,19,20,21,1,2,8,9. उलवे मुख्यमार्गे ते उलवे अग्निशमन केंद्र येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये अग्निशमन विभागातील २ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन, २जीप,३ बुलेट एकुण ८ अग्निशमन वाहने सहभागी झाली होती. या रॅली दरम्यान अग्निशमन दल हे सजगतेचे व तत्परतेचे प्रतीक ठरणार आहे, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि अग्निसुरक्षेबाबत सजग व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ,”एकत्र येऊ, अग्निसुरक्षित भारत घडवू” असा संदेश देण्यात आला.

अग्निशमन सेवा सप्ताह दरवर्षी १४ ते २० एप्रिल दरम्यान साजरा केला जातो. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईतील व्हिक्टोरिया डॉक येथे झालेल्या दुर्घटनेत ७१ शूर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आणि समाजात अग्निसुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने या सप्ताहा दरम्यान विविध प्रात्यक्षिके,एम एन एस.बिल्डींगमधील रुग्णालये, कार्यालये मॉक ड्रिल्स, प्रशिक्षण कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम घेण्यात आले.जेणेकरून नागरिक, कर्मचारी, उद्योग आणि संस्था अग्निसुरक्षेबाबत अधिक सजग होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button