जिंतीत हिप्नॉटीझम च्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या जाग्या केल्या बालपणाच्या आठवणी.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड(जिंती):- प्रतिनिधी
जिंती ता.कराड येथे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त ज्ञानप्रबोधिनी फौंडेशन जिंती व जिंती ग्रामस्थ यांच्या विद्यामानाने व्यक्तिमत्व विकासात संमोहनाची किमया कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला होता. यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात ठीक ९.३० वाजता झाली त्यावेळी अर्जून जाधव यांनी गणपतीचे सुंदर असे मंचावर चित्र काढून एक चित्रकलेचे प्रदर्शन केले. गावातील विशेष पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्याचबरोबर फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते. जि. प.शाळा जिंतीच्या चिमुकल्यानी कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनाचे गीत आणि नृत्य सादरीकरणाने झाली. त्यानंतर श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंतीच्या मुलींनी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून सावित्रीचा शिक्षणाचा लढा ही पथनाट्य सादर केले.
जि. प.शाळा जिंती, श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती मधील विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थ्यांचा सत्कार केला तसेच मागील वर्षी श्रीकांत कारंडे सर यांनी NMMS विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले होते. त्याप्रमाणे माजी मुख्याध्यापक श्रीकांत कारंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन व ज्ञान प्रबोधनी फाउंडेशन जिंती व तिचे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
शिरोली कोल्हापुर येथील संमोहनतज्ञ शशांक प्रिस्टे यांनी मानवी जीवनातील मनाच्या सामर्थ्याचे महत्त्व व व्यक्तिमत्व विकासासाठी सकारात्मक विचारांची गरज यावरती विचार व्यक्त करून कार्यक्रमाची शानदार सुरवात केली. प्रथम एकमेकास हात जोडून मनाची एकाग्रता करण्यास सांगून उपस्थित प्रेक्षकांमधीलच काही प्रेक्षकांना संमोहित केले. बहुतांश प्रेक्षकांनी स्वेच्छेने सहभाग घेतला त्यावर संमोहनतज्ञ शशांक प्रिस्टे प्रेक्षकांच्या मनावर ताबा घेऊन भूतकाळात जाऊन प्रश्न विचारायला सुरवात केली. कॉलेजमध्ये जीवन कसे होते हे विचारले तर संमोहित झालेल्या प्रेक्षकांनी आपल्या किशोरवयातील शालेय जीवनातील काही बाबी सांगितल्या. संमोहितांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी तरुणही सहभागी झाले होते. त्यांना भूतकाळात नेऊन १० वीच्या मित्राची माहिती विचारली असता, सर्व नावे सांगितली. गणिताची सूत्र सांगितले त्यानंतर अगदी १लीच्या आठवणी काढल्या नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच. या गाण्यावर सर्व संमोहित झालेल्या प्रेक्षकांना नृत्य करायला सांगितले त्यांनी ते अगदी लहान बाळाप्रमाणे नृत्य करू लागल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि पोट धरून खदाखदा हसायला लागले असा क्षण सर्व प्रेक्षकांनी अनुभवला. आपण लहान बाळ आहात आपणास रडू येते आहे मग आपण कसे रडाल असे सांगितल्यावर अक्षरशा लहान बाळाप्रमाणे तरुण मुले रडत होते ही किमया संमोहनाने घडते हे सर्वांना पहावयास मिळाले. आपण मागच्या जन्मी कोण होतो ही माहिती सुध्दा सांगितली. नंतर पूर्ववत होत जीवनावरच्या सर्व आयुष्याच्या स्थरातून जाऊन पूर्ववत केले.
संमोहित झालेल्या सर्व लोकांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सकारात्मक विकास दृष्टिकोन वाढेल यासाठी समोरची शक्ती काम करत असल्याचे संमोहनतज्ञ शशांक प्रिष्टे यांनी सांगितले. संमोहनाचा मनोरंजन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मनाच्या एकाग्रतेसाठी व सकारात्मक विचारासाठी उपयोग कसा करावा यासाठी सादर केलेला कार्यक्रम जिंती आणि जिंती च्या परिसरातील सर्व प्रेक्षकांच्या स्मरणात निश्चितच राहील असे मत ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले
ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंती व सर्व ग्रामस्थांच्या वतीने संमोहन तज्ञ शशांक प्रिष्टे यांचा सत्कार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व उपस्थितांचे आभार मानले.