भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी एक गाव एक जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक १४-०४-२०२५ रोजी सुकापूर ( पाली देवद) येथे एक गाव एक जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपून सर्व धर्म समभावाच्यावतीने दरवर्षी साजरी करण्यात येते. सकाळी ९.३० वाजता. धम्म ध्वजारोहण सकाळी १० वाजता बुद्ध पूजा महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच विश्वाला शांती देणारे महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला सुकापूर गावच्या सरपंच योगिता पाटील व ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य, अमित जाधव यांनी प्रतिमेला हार घालून त्रिशरण पंचशील घेतले व कार्यक्रमाला सुरुवात केली. तसेच दिवसभर भीम गायनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजक सुकापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता राजेश पाटील, अमोल इंगोले, वैभव राजू गवळी, गौतम भाऊ उबाळे, बाळासाहेब साळवे, राजेश जनार्दन पाटील, प्रज्ञाताई उबाळे, पत्रकार प्रताप आरेकर, बौद्धाचार्य पाखरे गुरुजी, अशोक भाऊ शेगोकार,
वंचित बहुजन आघाडीचे सुकापुर विभागीय अध्यक्ष अक्षय उबाळे, ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर सावंत, कुणाल इंगोले, श्रीकांत शितुरकर. तसेच शिवधर्म वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक पत्रकार राजपाल शेगोकार. प्रमुख सल्लागार अमित मोहन जाधव, किशन भुजंग महेश जनार्दन पाटील, राजेश केणी तसेच सदस्या निकिता महेश पाटील, रुपेश चव्हाण, कपिल कांबळे, संतोष गोटे, प्रतीक मोरे, चेतन साळवे, सचिन सोनवणे, राहुल गायकवाड, अक्षय भालेराव. आदि उपस्थित होते.
संध्याकाळी ६ सहा वाजता भीम जयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली, मिरवणूक निघत असताना सुकापुर गावामधील आजी माजी सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व गावकरी, बौद्ध बांधव व इतर समाजाचे सर्व जाती धर्मातील लोकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन व मिरवणुकीची शोभा वाढवली व मिरवणूक रात्री साडेदहा वाजता पुष्पकलश सोसायट येथे संपन्न झाली. तसेच भोजनदान ग्रामपंचायत सदस्य महेश जनार्दन पाटील यांच्या मार्फत देण्यात आले होते.