ठाण्यात वनमंत्र्याचा जनता दरबार!
"ठाण्यात भा, ज, पा, महाराष्ट्र वन मंत्री श्री, गणेश नाईक यांचा काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जनता दरबार",

झुंजार टाईम्स
श्रावण पाटील:- ठाणे प्रतिनिधी
ठाण्यात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र वनमंत्री माननीय गणेश नाईक यांच्या जनता दरबारात नागरिकांच्या मोठा प्रतिसाद, मंत्री महोदय यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व नागरिकांकडून निवेदन स्वीकारून नागरिकांशी संवाद साधला, महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे गटाला शह देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी दुसऱ्यांदा ठाण्यात जनता दरबार भरवला,
पहिला जनता दरबार खारकर आली ठाणे येथे भरवण्यात आला होता, या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला होता, वनमंत्री यांनी ठाण्यात दुसऱ्यांदा जनता दरबार भरुन नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले, वनमंत्री गणेश नाईक यांनी विकलांग दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या जाणून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे निवेदन घेवून अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या निवेदनाचे निवारण करण्यात आले,
या जनता दरबाराला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र वनमंत्री माननीय गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे, तसेच ठाणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाघुले , ठाण्यातील आजी माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते व विकलांग व दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने या जनता दरबारात उपस्थिती लावली,