श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त हिप्नॉटीझम व विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा २०२५.
ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंती चा अष्टकपूर्ती समारंभ.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड(जिंती) प्रतिनिधी
गेल्या आठ वर्षांपूर्वी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गावासाठी ज्ञानप्रबोधिनी फौंडेशनचे रोपटे लावण्यात आले.फौंडेशनची संकल्पना ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दर्जा उंचवावा यासाठी स्थापण करण्यांत आली.त्यावेळेस माजी विद्यार्थ्यांनी मेळावा घेऊन सर्वानुमते ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंती असे नामकरण करण्यात आले.प्रथमतः प्राथमिक शाळेतून केलेली ही सुरवात आता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यात यश दिसत आहे.जि. प. शाळा जिंती येथे बक्षीस वितरण, शैक्षणिक साहित्याचे शालेय गणवेश वितरण क्रीडा साहित्य व कीट, बाल संस्कार शिबीर ,इत्यादी कार्यक्रम करून एक वेगळा पायंडा पाडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम फौंडेशन करत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक उपक्रम म्हणजे बियरोपन व टाकाऊ पासून टिकाऊ प्लास्टिकचा कमी वापर यासारखे कार्यक्रम यावर्षी राबवले आहेत तसेच समाजचे आपण काही देणे लागतो या हेतूने जिंती पंचक्रोशीतील परिसरात डोंगर टेकड्यांवर एक लाख बियांचे रोपण करण्याचा कार्यक्रम करून काही अंशी निसर्ग संवर्धन करण्याचा प्रयत्न केला.निसर्गापासून आपणास अनेक फायदे मिळतात.अनेक आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात यासाठी सुद्धा आपण शिबीर यावर्षी घेतले होते.
गावामध्ये माझे गाव,स्वच्छ गाव या अभियानांतर्गत गावची स्वच्छता मोहीम सुध्दा राबवली आहे.श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंतीमध्ये पुस्तकांचा संच, विद्यार्थ्यांच्या साठी करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा देणाऱ्या तज्ज्ञांची व्याख्याने यासारखे कार्यक्रम पार पाडले आहेत. तसेच प्रथम तीन क्रमांक यांना १५ ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण ,विशेष प्राविण्य मिळवऱ्याना विशेष बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
ज्ञानप्रबोधिनी फौंडेशन जिंती यामध्ये गावातील डाँक्टर, इंजिनिअर,शासकीय सेवेत अधिकारी,पोलीसअधिकारी,पत्रकार,फौंजी,उद्योजक यांचाही यामध्ये समावेश आहे.सर्वजण वार्षिक होणाऱ्या कार्यक्रमात अगदी हिरहिरीने भाग घेऊन सहकार्य करतात.
ज्ञानप्रबोधिनी फौंडेशन जिंती व जिंती ग्रामस्थ याच्या संयुक्त विद्यमाने ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ मा.श्री शशांक प्रिष्टे सर यांचा व्यक्तिमत्व विकास यावर आधारित संमोहनाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमात यावर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गावातील ग्रामस्थांच्या व ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन जिंतीच्या वतीने करण्यात येत आहे.
विविध स्पर्धा परीक्षेत, विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी, युवकांनी गावाच्या लौकिकात भर घातल्याने यात्रेचे औचित्य साधून त्यांचा गुणगौरव करताना गावातील सर्व ग्रामस्थ, पालक वर्ग, उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानप्रबोधिनी फौंडेशन जिंती यांच्यातर्फे करण्यात येत आहे.