हरवलं सापडले

कळवा पोलिसांची दमदार कामगिरी!

"ठाणे कळवा पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची कर्तव्य दक्ष व उल्लेखनीय कामगिरी, हरवलेले मोबाईल फोन यांची उकल करून ,कळवा वाशीयांना आपले हरवलेले मोबाईल फोन मिळवून देण्यात कळवा पोलिसांना यश"..

झुंजार टाईम्स 

श्रावण पाटील:- ठाणे प्रतिनिधी 

ठाणे पो, कळवा येथील पोलिस अधिकारी अंमलदार यांची उल्लेखनीय कामगिरी..
तांत्रिक माहितीच्या आधारे कळवा पोलिस ठाण्यातील प्रॉपर्टी मिशिंगमधील मोबाइल फोनची उकल करण्यास कळवा पोलिसांना यश…

“कळवा पोलीस ठाणे परिसरात सन,२०२३ ते २०२५ या वर्षात विविध कंपनीचे मोबाईल फोन हरवले असून त्याबाबत कळवा पोलिस ठाण्यात प्रॉपर्टी मिशिंगचे नोंदी करण्यात आलेल्या आहेत”,

सदर प्रॉपर्टी मिशिंगच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक    अशोक उतेकर तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक, विठ्ठल नावडे, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, संतोष पिंपळे, व पोलिस स्टाफ, यांना प्रॉपर्टी मिशिंगची प्रकरणे उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने कळवा पोलीस ठाण्यामधील दाखल प्रॉपर्टी मिशिंगमधील मोबाईल फोन बाबतची सविस्तर माहिती पोलीस कॉन्स्टेबल ८०६६ प्रशांत लवटे, यांनी CEIR या अँपमध्ये भरून, त्यानुसार माहिती तांत्रिक पद्धतीने, बारकाईने विश्लेषण करून त्याअनुषंगाने हरविलेल्या मोबाईल फोनचा पत्ता संदर्भात अत्यंत कौशल्यपूर्ण माहिती प्राप्त करुन सदर पत्त्याबाबतची शहानिशा करुन, पत्त्यावर समक्ष जाऊन संबंधित प्रॉपर्टी मिशिंगमधील मोबाइल धारकाचे विविध कंपनीचे एकूण एकशे दोन मोबाईल फोनचा शोध घेऊन “दहा लाख सहासष्ट हजार”(१०,६६,०००) किमतीचे मोबाईल फोन हस्तगत करून ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे,
सदर कामगिरी मा, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे, पोलिस उपायुक्त, सुभाषचंद्र बुरसे परिमंडळ १ , ठाणे, शहर सह पोलिस आयुक्त, उत्तम कोळेकर कळवा विभाग, ठाणे शहर, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचना प्रमाणे वरील कामगिरी कळवा पोलीस स्टेशनमधील गुन्हेप्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहपोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, पो, हवा,६६१४ राहुल पवार, पो, हवा, निखिल जाधव पो, हवा,५४०८ उदय कोरे, पो, हवा,६५५४ दादा घुगे, पो, ना,२९१७ सचिन शिंदे, पो, कॉन्स्टेबल ४४११ नामदेव कोळी, पो, कॉन्स्टेबल ८०६६ प्रशांत लवटे , पो, कॉन्स्टेबल भूषण धनगर , पो, कॉन्स्टेबल, गोपनीय श्री, विजय पाटील स्टाफ यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button