खांदा कॉलनीमध्ये आसूडगाव येचे श्री स्वामी समर्थ प्रकट दीनादिवशी भाविकांची अलोट गर्दी.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
खांदा कॉलनी सेक्टर ५ मध्ये ३१ मार्च २०२५ रोजी बापदेव महाराज श्री स्वामी समर्थ सामाजिक व आध्यात्मिक सेवा केंद्रामध्ये प्रकट दिन साजरा करण्यात आला. एका वर्षांपूर्वीच बांधलेल्या मंदिरामध्ये प्रकट दिनादिवशी भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली. मंदिरामध्ये सर्व ठिकाणी फुलांच्या माळा लावून व लाईट डेकोरेशन करून मंदिर सजवले होते.मंदिरामध्ये ठीक-ठिकाणी बॅनर लावून भाविकांसाठी दर्शन रांग करण्यात आली होती.मंदिरामध्ये स्वामींच्या मूर्ती रेखीव पद्धतीने ठेवून फुले व हार घालण्यात आले होते. मंदिरामध्ये पिंपळाचे झाड असल्याने मंदिराला अजून महत्त्व प्राप्त झाले होते.
सकाळी ८ ते सायंकाळी ७.०० पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये भूपाळी , आरती, गोपाळकाला, श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा, बालसंस्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर सायंकाळी ७.३० नंतर प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
विशेषतः मंदिरामध्ये सकाळपासूनच दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या. येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात येत होता. योग्य ठिकाणी पार्किची पण व्यवस्था करण्यात आली होती, तर फलकावर महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा परिधान करून येण्याचा फलक लावण्यात आला होता. सकाळपासू किमान ५००० भाविकांनी दर्शन घेतले असावे असे श्री स्वामी समर्थ सामाजिक या आध्यत्मिक केंद्र यांच्याकडून समजले जात आहे या सर्व नियोजनाचे व कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडल्यामुळे या मंडळाचे पनवेल तालुक्यात कौतुक होत आहे.