बीसीटी लॉ कॉलेज( नवीन पनवेल ) मध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे फूड फेस्टिवलचे आयोजन.

झुंजार टाईम्स
शितल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
ता.३१ मार्च २०२५
नवीन पनवेलच्या बीसीटी कॉलेज ऑफ लॉ च्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने पहिल्यांदाच फूड फेस्टिवलचे एक दिवसीय आयोजन केले होते. फूड फेस्टिवलचा शुभारंभ कॉलेजच्या प्राचार्या आदरणीय सानवी देशमुख मॅडम यांच्या शुभहस्ते झाले. सोबत सर्व प्राध्यापक वर्ग ही उपस्थित होता.
पहिल्या वर्षाच्या या फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनीं ज्यांना काहीही अनुभव नसतानाही या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. या उपक्रमात बी.ए.एल.एल.बी.(पाच वर्ष) व एल.एल.बी.(तीन वर्ष) मध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग दिसून आला.
फूड फेस्टिवल मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जवळपास ३५ स्टॉल्स आपापल्या पद्धतीने छानपैकी सजवून,आकर्षक दिसतील अशा पद्धतीने तयार केले होते. या फेस्टिवलमध्ये खवय्ये ग्राहक म्हणून त्याच कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होऊन , प्रत्येक स्टॉलवरील खाण्याचे पदार्थ आणि कोल्ड्रिंक कुपन्स खरेदी करून खाण्यापिण्याचा छानपैकी आस्वाद घेत होते. फूड फेस्टिवलची वेळ सकाळी ९ ते ११ ची असल्याने सर्वच फूड स्टॉल वरील व सर्वच विद्यार्थी आपण यशस्वी रित्या पदार्थ बनवून तो सादर करण्यात यशस्वी झाल्यामुळे आनंदी आणि खुश दिसून येत होते.
प्राध्यापक ममता गोस्वामी , राघव शर्मा, सूरज भालेराव, अपराजिता गुप्ता, रवनीश बेक्टर, नेहा कांची , संग्राम पवार विद्यार्थ्यांच्या स्टॉल वरून फूड खरेदी करून स्वतः आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास निर्माण करून देण्याचा कॉलेजचा प्रयत्न छान होता .
सर्वात शेवटी प्राचार्य मॅडम आणि उप प्राचार्य धनश्री कदम यांनी त्यांच्या इतर प्राध्यापक सहकाऱ्यांना यांनी मिळून प्रत्येक स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन आपापल्या खाद्यपदार्थांची झालेली विक्री आणि स्वच्छता, चव ,सादरीकरण याची नोंद करून घेतली. खाद्यपदार्थांची सर्वात जास्त विक्री झालेल्या स्टॉल वरील विद्यार्थ्यांची अनुक्रमे नोंद करण्यात आली. तसेच भविष्याच्या सुंदर आणि गोड वाटचालीसाठी सर्वच विद्यार्थ्यांना खूप सार्या मनापासून शुभेच्छा देऊन,फूड फेस्टिवलची सांगता करण्यात आली.
प्राध्यापक राघव शर्मा आणि कांची मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी बनविलेले अन्न वाया जाणार नाही याचीं कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत विद्यार्थ्या सोबत थांबून योग्य ती दक्षता घेतली.