खेळ
भारती विद्यापीठात जिंतीच्या सुपुत्रानचा चित्रकलेत झेंडा.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
नवी मुंबई येथे भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या अंतर्गत ‘बहार २०२५ हा कार्यक्रम घेतला होता. दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो. अनेक चित्रकार या चित्रकला प्रदर्शनात सहभाग घेतात. बरेच नामांकित चित्रकार आपली आपली चित्रकला प्रदर्शित करतात.
सन २०२५ साली घेण्यात आलेल्या बहार या कार्यक्रमात जन्मभूमी पण कर्मभूमी कामोठे येथे शिक्षण घेणाऱ्या व चित्रकलेची आवड असणाऱ्या प्रणव संजय पाटील यांनी चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यावेळी प्राचार्य पी.एन टंडन यांनी विशेष कौतुक केले आणि मार्गदर्शन केले. तसेच जिंती व कामोठे परिसरातून प्रणव चे कौतुक केले जात आहे.