भक्ती श्रध्दा
आजीवली येथील गोकुळमध्ये भक्तिभावाने सत्संग कार्यक्रम संपन्न.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
आजीवली येथील गोकुळ कॉम्प्लेक्समध्ये संत निरागम समागम कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. रविवारी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत प्रचारक प्रकाश पार्लेजी यांच्या उपस्थित पार पडला. या ठिकाणी आजीवली व परिसरातील सर्व भाविक उपस्थित होते.
प्रथमतः देवाचे भजन बोलून कार्यक्रमास सुरवात झाली. सर्व भाविकांनी महाराजाचे दर्शन घेतले. प्रचारक प्रकाश पार्लेजी यांनी मनुष्य देह परमेश्वराने दिला आहे, याचे विस्तृत माहिती सांगितली. त्यांनी ज्ञानकशा मध्ये सत्संगची उद्देश सांगितले. त्यानंतर येणाऱ्या सर्व भाविकांना प्रसाद ठेवण्यात आल होता. तसेच सत्संगच्या सेवादलाने मंडप,लाईट, डेकोरेशन इत्यादी साहित्य व सर्व नियोजन योग्यरीत्या पार पाडले.