सामाजिक
Trending

पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या पक्षाला जिवदान.

दैनिक झुंजार टाईम्स 

राजपाल शेगोकार:- ठाणे प्रतिनिधी 

ठाणे : कॉसमॉस २७ जीबीआर सोसायटीत (कासरवाडावाली ) झाडावर पतंगाच्या दोऱ्यात पाय अडकलेल्या पक्ष्याला स्थानिक नागरिक सागर अढांगळे यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केले. संध्याकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजता ही घटना घडली. पक्षी दोन-तीन तासांपासून झाडावर अडकलेला होता, तर दुसरा पक्षी त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता.

सागर अढांगळे यांनी तात्काळ इंटरनेटवर पक्षी बचाव पथक शोधले, परंतु संध्याकाळी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी तीन-चार वेळा अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने मात्र, “या वेळी येऊ शकत नाही, आणि गाडी पाठवू शकत नाही, सकाळी ६.३० वाजता संपर्क करा,” असे सांगून मदत नाकारली. सागर अढांगळे यांनी पक्ष्याचे प्राण जाऊ शकतात, असे सांगून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु यश मिळाले नाही.

शेवटी अढांगळे यांनी थेट पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पक्ष्याच्या अडकल्याची तक्रार दर्ता केली आणि तात्काळ मदत मागितली. काहीच मिनिटांत पोलिस उपनिरीक्षक भगवान बोरसे आणि साचिन हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी केल्यानंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाने तात्काळ वाहन पाठवून पक्ष्याला सुरक्षितपणे खाली उतरवले आणि वाचवले.

या घटनेमुळे नागरिकांच्या जागरूकतेने आणि मानवतेच्या भावनेने अनेक प्राणी वाचवता येतील, हे सिद्ध झाले. अशा प्रकारच्या मदत आपण सर्वजण नेहमीच करू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button