ज्येष्ठ पत्रकार स्व. प्रीतम कुमार सिंह ‘त्यागी’ यांच्या स्मरणार्थ साईनगर येथे पतंग उत्सवाचे आयोजन.

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २९-०१-२०२६

पनवेल :- मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर ज्येष्ठ पत्रकार कै. प्रीतम कुमार सिंह ‘त्यागी’ यांच्या स्मरणार्थ साईनगर असोसियशन व लायन्स क्लब पनवेल आयोजित पतंग उत्सव २०२६ हा उपक्रम पनवेल येथील एस.पी. मैदान, साईनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा पंतग उत्सव सन् २०१७ पासून ते सन् २०२६ पर्यंत निरंतर या ठिकाणी आयोजित करण्यात येत असून, हा उत्सव जेष्ठ पत्रकार स्व. प्रीतम कुमार सिंह ‘त्यागी’ यांच्या संकल्पनेने सुरू केला होता. विशेषतः हा उत्सव कोरोना काळात सुद्धा कोरोना महामारीचे अटी आणि नियमांच्या अधिन राहुन पार पाडण्यात आला होता.

ज्येष्ठ पत्रकार कै. प्रीतम कुमार सिंह ‘त्यागी’ यांच्या मृत्यु पश्चात त्यांची सुकन्या पुरोगामी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा संघटक प्रतिमा चौहान (अखिल भारतीय क्षत्रिय महासभा कोकण विभागीय सचिव, लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या सभासद तसेच माँ शक्ती सामाजिक संस्थेच्या सचिव) आणि त्यांचे सुपुत्र किरण कुमार प्रीतम कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. पतंग उत्सवासाठी साईनगर एसोशिएशनचे अध्यक्ष पांडुरंग मोकल यांनी मैदान उपलब्ध करून देऊन त्यांची विशेष उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी तिळगुळ व खिचडी प्रसादाचे वितरण, तसेच हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, जिल्हा संघटक उमाजी मंडले, लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा सुरभी पेंडसे, उपध्यक्षा मंगला ठाकूर (अ. भा. क्ष. म. कोकण विभागीय अध्यक्षा), संगीता मनोजसिंह परदेशी (अ. भा. क्ष. म. महाराष्ट्र प्रदेश महिला प्रकोष्ठ मंत्री अध्यक्षा तथा केशव स्मृति नागरी सहकारी पतपेठी संचालिका), अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.

ममता प्रीतम म्हात्रे आणि स्नेहल ढमाले (नगरसेविका प्रभाग क्रं. १८ पनवेल, भारतीय जनता पार्टी), मोहिनी विक्रांत पाटील (भारतीय जनता पार्टी) सह निलम दत्तात्रेय कडू (शेतकरी कामगार पक्ष साई नगर महिला आघाड़ी अध्यक्षा) यांनी विशेष उपस्थिती दिली.
स्वाती निलेश स्वामी (शिवा विश्वनाथ पावन महादेव मंदिर), अल्का चव्हाण, ज्योती बुतड़ा, हेमंत सिंह ठाकूर सूर्यवंशी (अ. भा. क्ष. म. पनवेल ता. अध्यक्ष तसेच माजी अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पनवेल), भरतसिंह ठाकूर (अ. क्ष. म. स. सभासद) छाया भरतसिंह ठाकूर (अ. क्ष. म. स. सभासद), सुनिता जयसिंह परदेशी (अ. क्ष. म. स. सभासद), अंजली अजिंक्य परदेशी (इनरव्हिल न्यू पनवेल अध्यक्षा आणि अ. क्ष. म. स. सभासद), हुमा रूपेशसिंह ठाकूर (प्राध्यापिका गुरू ग्लोबल प्री स्कूल), रंजना दालवाले (अ. क्ष. म. स. सभासद), वर्षा शैलेश दालवाले (शिक्षिका ड्व्यु ड्राप्स इंग्लिश स्कूल व (अ. क्ष. म. स. सभासद), गंगा मोहनसिंह परदेशी (अ. क्ष. म. स. सभासद), सुषमा प्रसाद, गुजल गुप्ता, नेहा पांडे, नितू पांडे, ज्ञानवती यादव, प्रतिभा विश्वकर्मा, शिला यादव, वैशाली विजय जाधव, शालिनी श्यामकांत म्हात्रे, प्रमिला रोशन म्हात्रे, स्वप्ना भंडारी, रूपा शेट्टी, माया रधुनाथ शिर्के (मौत्रिण शॉप) सुरेखा दिलीप राठौड़ सह इत्यादी महिलांनी हळद कुंकु, पुष्प आणि शाखरसह खिचड़ी प्रसादचा आनंद घेतला.

या स्मरणार्थ कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी कै. प्रीतम कुमार सिंह ‘त्यागी’ यांच्या पत्रकारितेतील योगदानास भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांच्या कार्याची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरेची जपणूक आणि स्मरणकार्याची प्रेरणा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा भारतीय सणात खेळांचा मौलाचा वाटा असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थित पदाधिकारी व सहकाऱ्यांनी रायगड जिल्हा संघटक प्रतिमा चव्हाण यांचे विशेष कौतुक केले.
पतंग उत्सवाच्या माध्यमातून आनंद, एकोपा आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



