
दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २१-०१-२०२६
अहमदपूर:- आज सकाळी ठीक ११.०० वाजता अहमदपूर येथील जिल्हा परिषद शाळा सुरू असताना शाळेबाह्य तसेच काही कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुले विनापरवानगी शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत असल्याचा प्रकार निदर्शनास आला.
शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मध्यांतराच्या वेळेत मैदानावर येत असताना क्रिकेट बॉल लागून इजा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने तात्काळ हस्तक्षेप करत अनाधिकृतपणे क्रिकेट खेळणाऱ्या शाळाबाह्य मुलांना मैदानाबाहेर जाण्यास सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापनाकडून शाळेच्या वेळेत जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीची अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही शाळाबाह्य व्यक्तींनी अथवा विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर खेळण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी प्रवेश करू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा परिषद प्रशाला मुलांची अहमदपूरच्या वतीने करण्यात आले.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शालेय शिस्त व शैक्षणिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी शाळेच्या मैदानाचा वापर नियमानुसारच व्हावा, अशी भूमिका विद्यार्थी संसद,शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने घेतली आहे. याकरिता शाळेत CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून पालक व नागरिकांनी यास सहकार्य करावे, असेही आवाहन मुख्याध्यापक माधव गुंडरे, नोडल अधिकारी नागनाथ कदम,मोहन पाटील, पांडुरंग उगिले, अशोक थोरात, निर्मला नागरगोजे, प्रियांका थोरात,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेश्मा शेख आणि विद्यार्थी संसद यांच्यातर्फे करण्यात आले आहे.




