
दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १९-०१-२०२६
लातूर:- विश्वकर्मीय समाजातर्फे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आज लातूर येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. समाजातील युवक-युवती व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मेळाव्याला लाभला.
या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून अनंत पांचाळ यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेश आगलावे व विजय रायमल यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन सुतार (प्रदेश अध्यक्ष, VVS), सुदर्शन बोराडे (राज्य संपर्कप्रमुख, VVSS), किस्किंदा ताई पांचाळ, अरुणजी भालेकर (कार्याध्यक्ष), राजेश भालेकर, शुभांगी पांचाळ, भगवान राऊत, जयश्री पांचाळ, सत्यनारायण पांचाळ व जगन्नाथ लोहारे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रस्तावना बळवंत पांचाळ यांनी करताना समाजातील विवाह विषयक अडचणी व त्यावर उपाय म्हणून अशा मेळाव्यांचे महत्त्व विशद केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पांचाळ यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने केले.
या मेळाव्यामुळे समाजातील वधू-वर व पालकांना एक विश्वासार्ह व सुसंस्कृत व्यासपीठ उपलब्ध झाले असून, भविष्यातील सामाजिक एकोप्यास चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
ह.भ.प.परमेश्वर महाराज पांचाळ टाकळगाव का अध्यक्ष बालाजी मधुकर पांचाळ शिरूर ताजबंद उपाध्यक्ष श्रीहरी पांचाळ अहमदपूर सचिव पंकज पांचाळ कोषाध्यक्ष बालाजी पांचाळ नांदूर राजू पांचाळ बेलूर
सोमनाथ पांचाळ शिरूर बालाजी पांचाळ मोरेवाडी सूर्यकांत पांचाळ महादेव वाडी दिलीप पांचाळ जगळपुर राम पांचाळ टाकळगाव सूर्यकांत पांचाळ अहमदपूर राम पांचाळ काजळ हिप्परगा गणेश पांचाळ माडणी गणेश पांचाळ शिरूर बालाजी पांचाळ बोरक बालाजी पांचाळ शेळगाव सर्व विश्वकर्मा समाज अहमदपूर




