सत्कार समारंभ
Trending

लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून दोनशे तीन मुलींचे मातृत्वाच्या भूमिकेतून सुवर्णा दुरुगकर यांनी पालकत्व स्वीकारले–सागर वरांडेकर

माजी बालविकास प्रकल्प अधिकारी तथा वरिष्ठ पर्यवेक्षिका सुवर्णा दुरुगकर यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमात गटविकास अधिकारी यांचे प्रतिपादन.

दैनिक झुंजार टाईम्स 

राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी

दिनांक:- ०८-०१-२०२६

देवणी :- एकात्मिक महिला व बाल विकास सेवा कार्यालय देवणी येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ पर्यवेक्षिका तथा माजी बालविकास प्रकल्प अधिकारी तथा सुवर्णा दुरुगकर या वयामानाने एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाल्या त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम देवणी पंचायत समिती सभागृहात ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवणी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सागर वरंडेकर हे होते सुवर्णा दुरुगकर यांना सेवापुर्ती शुभेच्छा देताना लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सुवर्णा दुरुगकर यांनी दोनशे तीन मुलींना लाखोपती बनवून पालकत्व स्वीकारले असे प्रतिपादन गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांनी या प्रसंगी केले

गटविकास अधिकारी पुढे म्हणाले की”नोकरी म्हंटल की बदली पदोन्नती सेवानिवृत्ती या चक्रव्हिहातुन सर्व कर्मचारी यांना मार्गक्रमण करावे लागते. नोकरी दरम्यान त्यानी केलेल्या कार्याची पोच पावती म्हणजे सेवा निवृत्तीनंतर मिळणार प्रेम ” नोकरी कार्यकाळात कमविलेली नाव लौकिकता सेवा निवृत्तीनंतरचा निरोप समारंभ असतो अश्याच सेवाभावी वृतीने सुवर्णा दुरुगकर एकोणतीस वर्षे एकात्मिक महिला व बाल विकास सेवा कार्यालयात वरिष्ठ पर्यवेक्षिका ते बाल विकास प्रकल्पअधिकारी म्हणून जे काम केले त्यानी आपल्या आयुष्यात नेत्रादीपक कार्य उभं केलं हे नक्कीच आकाशाला गवसनी घालणारे आहे. आणि लेकलाडकी योजनेच्या माध्यमातून दोनशे तीन (२०३)मुलींना प्रत्येकी एक एक लाख रुपये प्रशासनाच्या माध्यमातून मिळवून देऊन गरीब घरात जन्मलेल्या मुलीचे शैक्षणिक सामाजिक, आर्थिक वैवाहिक, पालकत्व स्वीकारणाऱ्या सर्व मुलीच्या माई सुवर्णा दुरुगकर ह्या वयामानाने आज सेवानिवृत्त झाल्या आहेत. यांच्या नावातच सोनं असलेल्या सुवर्णा २०३ मुलीच्या जीवनाच सोनं करुन सेवानिवृत्त झाल्या आहेत, त्याच्या लोकांभिमुख प्रशासनाने आयुष्यभर जीवाचं रांन करणाऱ्या सुवर्णा दुरुगकर होतं असे सांगितले त्यामुळे यांचा सर्व क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सत्कार होतं आहे त्यांना सेवानिवृत्ती नंतरचा कार्यकाळ सुखी समृद्धीचा जाओ त्याना उदंड आयुष्य लाभो हिच शुभेच्छा …दिल्या दुरुगकर कुटूंबाचा भव्य असा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर उपस्थित होते हा कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या विभागाचे विस्तार अधिकारी राजकुमार अल्लापुरे या विभागाच्या कनिष्ठ सहाय्यक संगीता सूर्यवंशी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, तर देवणी तालुक्यातील कार्यकरती मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ प्रशासन ओंकार वंजारी यांनी केले तर आभार सुवर्णा दुरुगकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button