शिरूर ताजबंत येथे विश्वकर्मा वधू -वर मेळावा उत्साहात संपन्न.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- ०६-०१-२०२६
लातूर:- आज शिरूर ताजबंद येथे पार पडलेली आगामी विश्वकर्मा वधू-वर मेळाव्याची बैठक अत्यंत जोशपूर्ण, उत्साहाने भरलेली आणि ऐतिहासिक ठरली. शिरूर ताजबंद, अहमदपूर व जळकोट येथील विश्वकर्मा बांधवांनी लातूर टीमचे अभूतपूर्व, मनापासून आणि दिमाखात स्वागत करून आपली एकजूट दाखवून दिली. या बैठकीत समाजाच्या एकतेचा, संघटनेच्या ताकदीचा आणि लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या यशाचा ठाम निर्धार स्पष्टपणे दिसून आला. आगामी वधू-वर मेळावा भव्य, यशस्वी आणि समाजाला नवी दिशा देणारा करण्यासाठी सर्वांनी एकमताने हातात हात घालून पुढे जाण्याचा निर्धार केला. अशा प्रेरणादायी वातावरणात मिळालेले प्रेम, पाठिंबा आणि सहकार्य यासाठी शिरूर ताजबंद, अहमदपूर व जळकोट येथील सर्व मान्यवर व बांधवांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. एकत्र आहोत, एकत्र पुढे जाऊ आणि एकत्र जिंकू — हाच आमचा संकल्प!”




