विकास शिरसट (पोलीस पाटील) यांच्यावर ईश्वरपूर उपविभागीय पोलिसांकडून कौतुकाची थाप.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- सांगली प्रतिनिधी
दिनांक २०-१२-२०२५
सांगली:- महाराष्ट्रात दरवर्षी १७ डिसेंबर रोजी पोलिस पाटील दिन साजरा केला जातो. पोलीस पाटील नेहमी गावातील गाव पातळीवर कायदा-सुव्यवस्था राखणे, पोलिसांना सहकार्य करणे,गुन्हे प्रतिबंध, शांतता व सलोखा राखण्यात भूमिका शासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतो.
सांगली जिल्ह्यात सन्माननीय विकास शिरसाट हे सावंतवाडी येथील पोलीस पाटील पदावर काम करत आहेत. त्यांनी गाव पातळीवर कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन पर्यंत न जाता गाव पातळीवर अनेक वाद विवाद मिटवून त्यांनी गावचा अनाठाई होणारा खर्च थांबवला. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात घर निर्माण केले आहे.
शिराळा तालुक्यातील सावंतवाडी गावचे सन्माननीय विकास शिरसट (आण्णा) यांना १७ डिसेंबर रोजी पोलीस पाटील दिनानिमित्त उल्लेखनीय काम केल्याबद्दल ईश्वरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP ) मा. अरुण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. विकास शिरसाट यांच्या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक कौतुक होत आहे तसेच विशेष म्हणजे त्यांच्याकडे सावंतवाडी बरोबर अजून तीन गावचा म्हणजे संपूर्ण मेणी खोऱ्याचा चार्ज सद्या त्यांच्याकडे आहे तसेच ते सध्या शिराळा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष म्हणून पण काम करत आहेत….




