सामाजिक

के एल ई कॉलेज कळंबोली येथे रिक्षा बोर्डाचा उद्घाटन थाटात संपन्न! 

दैनिक झुंजार टाईम्स 

पनवेल प्रतिनिधी :- राजपाल शेगोकार

दिनांक:- १५-१२-२०२५

कळंबोली:-  दिनांक:१२-१२-२०२५ रोजी के. एल. ई. कॉलेज कळंबोली रिक्षा नाका बोर्डाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र भगत तसेच पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षा गायकवाड व पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मोनिका महानवर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कळंबोली ते पनवेल शहर रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी नाका अध्यक्ष बाळू भालेकर, खजिनदार जितेंद्र म्हात्रे, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हा सचिव तसेच शिवधर्म वृत्तपत्र व झुंजार टाईम चे कार्यकारी संपादक राजपाल शेगोकार यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.     

तसेच सर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी रमेश शेलार, कृष्ण नवले , दीपक रोड पालकर, तानाजी मोटे, राजू इथापे ,पोपट ठोंबरे, प्रशांत पाटील, सुमित धरम, सचिन शिरसाट, हरिभाऊ बोराडे, संतोष बोलांडे, अंबादास सुरासे, पांडुरंग शिनारे, विजय गवळी, दीपक पाटोळे , दीपक सोनताटे, संतोष कांबळे, शरद आदईकर, प्रेम जोशी, प्रविण ठाकूर, सुरज सादिगले,व इतर सर्व रिक्षा चालक मालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला व रिक्षा चालकांनी नाका अध्यक्ष बाळू भालेकर यांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button