३० डिसेंबर २०२५ रोजी ,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे !

दैनिक झुंजार टाईम्स
मुंबई प्रतिनिधी :नानासाहेब डी खैरे.
दिनांक २४-१२-२०२५
मुंबई:- दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन उत्सव संपन्न होत आहे .हा केवळ एका संघटनेचा उत्सव नसून सत्यनिष्ठ, निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेच्या यशस्वी वाटचालीचा गौरवपूर्ण सोहळा ठरला आहे. या निमित्ताने संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजय सूर्यवंशी साहेब यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची भूमिका, संघातील प्रत्येक पत्रकाराला आपलेपणाची भावना देणे आणि संघाची शान सातत्याने वाढवत नेणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे ठळक वैशिष्ट्य मानले जाते .
तसेच सत्य, निर्भीड पत्रकारिता आणि सामाजिक मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून सुरू झालेला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आज देशभर विस्तारलेला एक मोठे कुटुंब बनला आहे. स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणी, संघर्ष, आर्थिक मर्यादा आणि भावनिक आव्हाने आली, मात्र संघाची वाटचाल कधीही थांबली नाही. कारण प्रत्येक पत्रकाराचे मनोबल उंचावलेले राहावे, हीच संघाची खरी ताकद ठरली आहे. एकजूट, परस्पर विश्वास आणि संघभावना यामुळेच संघ आज आठव्या वर्धापन दिनापर्यंत सक्षमपणे पोहोचला आहे.
या प्रवासात ज्यांनी स्वतःचा वेळ, विचार आणि संघर्ष संघासाठी दिला, अशा सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. पत्रकारितेचा सन्मान राखत समाजातील प्रश्न निर्भीडपणे मांडणे, वंचित आणि दुर्लक्षित घटकांचा आवाज बनणे आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणे, हे संघाचे मूलभूत ध्येय राहिले आहे. हे ध्येय अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी माननीय विजय सूर्यवंशी साहेब सर्वांशी एकनिष्ठ प्रेमभावनेने वागतात आणि प्रत्येक पत्रकाराचे मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
संघाच्या कार्याचा सामाजिक पातळीवरही मोठा प्रभाव दिसून येतो. ग्रामीण भागातील प्रश्न, सामान्य नागरिकांच्या अडचणी, प्रशासनातील त्रुटी, तसेच सामाजिक अन्याय यावर प्रकाश टाकण्याचे कार्य संघाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ हा केवळ पत्रकारांचा मंच न राहता समाजपरिवर्तनाची प्रभावी चळवळ म्हणून ओळख निर्माण करत आहे.
आठव्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सर्व वाटचालीत आपले शुभचिंतक व हितचिंतक नानासाहेब डी. खैरे आपले मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. तसेच मी संघाच्या कार्याचा गौरव करत, माननीय विजय सूर्यवंशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भविष्यात अधिक व्यापक, अधिक सक्षम आणि अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास आहे. तसेच सत्यासाठी आणि समाजासाठी बुलंद आवाज आणखी बुलंद करत हा संघ येणाऱ्या काळातही पत्रकारितेच्या मूल्यांची पताका उंचावत राहील, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो . आपला हित चिंतक: मुंबई प्रतिनिधी नानासाहेब डी खैरे.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ चांदिवली मुंबई नंबर 400072




