भिमाच्या लेकरांनी चैत्यभुमीवर केले संविधानाचे वाटप.

दैनिक झुंजार टाईम्स.
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०७-१२-२०२५
मुंबई:- दिनांक ६ डिसेंबर २०२५ ला भीमाची लेकऱं ऑर्गनायझेशन द्वारा चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे येणा-या बांधवाना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण हा भव्य आणि प्रेरणादायी उपक्रम भिमाच्या लेकरांकडुन अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमाचे यश हे आपल्या संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याच्या निस्वार्थ परिश्रम, समाज सेवेची भावना, सामाजिक बांधिलकी आणि समाजाबद्दलच्या जबाबदारीचे द्योतक आहे. असे मत संघटनेचे अध्यक्ष डॉ दिलीप पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
या विशेष , उपक्रमासाठी अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील , सचीव डॉ. संजय रायबोले, डॉ चंद्रमणी गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली हां अत्यंत स्तुत्य उपक्रम भिमाच्या लेकरांनी हाती घेतला.मुंबई विभागातील डॉ नितिन चवरे, डॉ. राहुल तुपे सर, डॉ. दिगांबर खोबरागड़े, डॉ संकल्प गजभे, डॉ सुधाकर कांबळे, डॉ रविंद्र मेंढे, प्रा. लिंताज उके. डॉ संदेश डोंगरे, दिनेश बोधनकर, गोलू मेश्राम, सुरेश गजभिये, डॉ संजय बन्सोड, डॉ संतोष पाटील, डॉ सुधाकर थुल, डॉ मंगेश वागदे, डॉ नितेश मोटघरे, डॉ. बालाजी लातुरे, प्रा. मंगेश भितरे, यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी आणि अनुकरणीय, आणि प्रशंसणिय ठरला. भिमाच्या लेकरांनी केलेल्या या कार्याचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे.
या स्तुत्य उपक्रमाला दुरदर्शन विभाग मुंबई चे उपसंचालक आयु.यतिश हाडके साहेब, मुंबई हाईकोर्टचे प्रसिद्ध वकील ॲड. भाऊराव चंनकापुरे (मुंबई), आयु. प्रा. प्रेमरत्न चौफेकर (मुंबई) संचालक सार्वभौम दैनिक यांची प्रमुख पाहुने म्हणून विशेष उपस्थिति होती.
सर्वानी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन घर तेथे संविधान पोहोचविण्याचा संकल्प या प्रसंगी भिमाच्या लेकरांनी केला.




