स्व. शेख रशीद शेख शफी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त घाने ZP शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.

दैनिक झुंजार टाईम्स
प्रतिनिधी – घाने
दिनांक:- ०४-१२-२०२५

मालेगाव:- माजी आमदार तथा माजी महापौर स्व. शेख रशीद शेख शफी साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद शाळा, घाने (मुले) येथे विद्यार्थ्यांना चार रेघी वह्या तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. खलील हाजी शेख रशिद होते. या वेळी माजी नगरसेवक भारत चव्हाण यांनी स्व. शेख रशीद साहेबांच्या लोकाभिमुख कामांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रेरणादायी संदेश दिला.
साहित्य वाटप कार्यक्रमाला नविद खमीब, शेख ऐसान, माजी नगरसेवक दीपक शिंदे, संदीप पाटील, मुख्याध्यापक प्रदीप सुर्यवंशी, राजेश पटाईत, कल्याण शिंदे, नारायण शिंदे, विनायक वाघ, बाळू बित्हाडे, आनंद यशोद, सचिन आहिरे, विकास पवार, दिनेश मेराळे, रवि पवार, कपिल देवरे, मुकेश मगरे, संदीप केले, दावल सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी करण भारत चव्हाण आणि आश्विनी आकाश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत सांगितले की,
“गोर-गरीब मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आम्ही सदैव जिल्हा परिषद शाळा घानेसोबत उभे आहोत.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन भिमराव मगरे यांनी मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रदिपदादा सुर्यवंशी, नाना बागुल, सुलभा ठाकरे, सुनंदा शिंदे, स्वाती ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.




