सोनार समाजाच्या आक्रोश मोर्चाला आमदार मा. प्रदीप जैस्वाल यांचा जाहीर पाठिंबा.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिध
दिनांक:- ०५-१२-२०२५
मालेगाव (जि. नाशिक) येथील डोंगराळे गावातील कु. यज्ञा दुसाने या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. या भयंकर घटनेचा आमदार प्रदीपजी जैस्वाल साहेब यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी ते कायदेशीर पातळीवर ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
्
याच पार्श्वभूमीवर ५ डिसेंबर रोजी सोनार समाज व समस्त छ्त्रपती संभाजीनगरकरांच्या वतीने क्रांती चौक येथून आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला आमदार प्रदीप जैस्वाल तसेच शिवसेना छत्रपती संभाजीनगर मध्यचा जाहीर आणि ठाम पाठिंबा असल्याची घोषणा त्यांनी केली.
या संदर्भात बोलताना सांगितले की, “या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत लढा सुरू राहील.”
तसेच या मोर्चात सर्व शिवसेना नगरसेवक, महिला आघाडी, शिवसैनिकांनी, नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे ठाम आवाहनही त्यांनी केले.



