आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा सचिव पदी आनंदा धेंडे यांची नियुक्ती.

दैनिक झुंजार टाईम्स
धनाजी पुदाले:- प्रतिनिधी
दिनांक:- ०१-११-२०२५
पुणे:- पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील रहिवासी आनंदा धेंडे यांची आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आनंदा धेंडे यांना समाजकार्याची जबरदस्त आवड आहे, म्हणूनच आझाद समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी त्यांच्या खांद्यावर जिल्हा सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे.
यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्षांनी सांगितले की आनंदा धेंडे ही व्यक्ती समाजातील तळागाळातल्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करतील, तसेच समाजातील गोरगरीबांना सोबत घेऊन समाजात नवचैतन्य निर्माण करतील अशी आशा व्यक्त केली.
आनंदा धेंडे हे फार पुर्वीपासूनच समाज कर्यात अग्रेसर आहेत. आणि आता त्यांना ही जिल्हा सचिव पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्या हस्ते आनंदा धेंडे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ जाधव, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, जिल्हा संघटक सागर शितोळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक शिंदे व इतर पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.




