राजकारण
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा ६८वा वर्धापन दिन महाड येथे साजरा होणार.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०२-११-२०२५
पनवेल – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पक्षाचा ६८वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
मूळत: हा कार्यक्रम दिनांक ३ ऑक्टोबर रोजी होणार होता; मात्र महाराष्ट्रात आलेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलण्यात आला होता. आता हा कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजी महाड येथे भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने महाड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन रिपाईचे पनवेल तालुका युवक अध्यक्ष आयु. आशिष आत्माराम कदम यांनी केले आहे.




