राजकारण

रिपाईच्या पनवेल तालुका युवक आघाडीच्या व पनवेल विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश पार पडला.

दैनिक झुंजार टाईम्स 

महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी 

दिनांक:- १७-११-२०२५

पनवेल:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या पनवेल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आयु विजय दादा गायकवाड व तालुका युवक आघाडी अध्यक्ष आयु आशिष आत्माराम कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कळंबोली शहर अध्यक्ष आयु मोहन बलखंडे व सेक्रेटरी नवीनजी सोनावणे यांच्या सहकारी मित्रांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.तसेच करंजाडे येथील आयु.संतोष कांबळे यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.सदर कार्यक्रम हा पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर जिल्हा उपाध्यक्ष आयु.शरद पाटील साहेब,जिल्हा प्रभारी आयु मोहनिश दादा गायकवाड, पनवेल विधानसभा अध्यक्ष आयु विजय दादा गायकवाड पनवेल तालुका युवक अध्यक्ष आयु आशिष आत्माराम कदम रोजगार आघाडी तालुका अध्यक्ष आयु राजू इंगळे,पनवेल शहर अध्यक्ष आयु प्रविण दादा जाधव, कळंबोली शहर अध्यक्ष आयु मोहन बलखंडे व सेक्रेटरी नवीनजी सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी बोलताना आशिष कदम यांनी पक्षाची ध्येय धोरण समजून सांगितली तरूणांनि रिपब्लिकन पक्ष अधिक बळकट करावा.कुठेही गालबोट लागणार नाही अशी वर्तन करू नये.लोकांची कामे करा पक्ष तुमच्या सोबत आहे.असे मोहन बलखंडे यांनी सांगितले विजय गायकवाड यांनी तरुणांचे पक्षात हार्दिक स्वागत आहे पक्ष अध्यक्ष म्हणून लोकांच्या समस्या जाणून घ्या एकसंघ रहा लोकांपर्यंत जा सभासद वाढवा.असे सांगितले.शेवटी बोलताना मोहनिश गायकवाड यांनी आठवले साहेब आपले नेते आहेत पायाला भिंगरी लावून संबंध भारत नाही तर देशभर फिरणारे नेते आहेत पक्ष संघटन मजबूत करण्याचे तरुणांना आव्हान केले.

 पक्षात प्रवेश केलेल्यांची नावे 

 

१) सूरज कदम – कळंबोली शहर अध्यक्ष 

२) नागसेन शिनगारे – कळंबोली उपाध्यक्ष 

३) सचिन खराटे – सेक्रेटरी 

४) सुनीत जाधव -सह सेक्रेटरी 

५) योगेश सावंत – खजिनदार 

६) प्रविण कदम -कार्याध्यक्ष 

७) श्रीधर मोहिते – सल्लागार 

८) संतोष कांबळे – करंजाडे शहर अध्यक्ष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button