पनवेल महानगर पालिकेची आरक्षण सोडत जाहीर!

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ११-११-२०२५
पनवेल:- पनवेल महानगर पालिकेने दिनांक ११/११/२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हॉल येथे पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढल्याने सर्व इच्छुक उमेदवार यांची रेलचेल सुरू झाली आहे. यातच प्रभाग क्रमांक १२अ मधून आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आयु. आशिष आत्माराम कदम हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत स्थानिक नागरिकांच्या समस्या विज, पाणी,रस्ते वाहतूक कोंडी या सर्व गोष्टींचा अभ्यास असलेले तरुण पदवीधर प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आशिष आत्माराम कदम यांच्या कडे पाहिले जाते. आशिष कदम हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पनवेल तालुका युवक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती सोबत रिपाइं असल्यामुळे आशिष कदम यांचा विजय निश्चित आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.




