लातूर जिल्ह्यात मोठा रस्ता भ्रष्टाचार स्फोट! देऊळवाडी–दापका रस्ता ४ महिन्यात उध्वस्त; गावकऱ्यांचा प्रशासनाविरोधात बंड! पोलिसांचेही हात वर!

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १८-११-२०२५
लातूर / उदगीर — ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता जेव्हा संघर्ष करूनही न्याय मिळत नाही… तेव्हा प्रश्न उरत नाही—प्रशासन जागं आहे की ठेकेदारांच्या दबावाखाली?
देऊळवाडी ते गुंडोपंत-दापका रस्ता कोट्यवधी रुपयांत बनला. पण केवळ चार महिन्यांत रस्ता पूर्ण कोसळला! रस्त्यावर मोठे खड्डे, खडी वर आली, डांबर गायब… आणि गावकऱ्यांच्या जीवाला धोका.
हे सर्व गावकरी शांत बसले नाहीत—तक्रारी, अर्ज, दौरे, फोन… तहसील, जिल्हाधिकारी, PWD सर्वांकडे तक्रारी केल्या. पण परिणाम? पूर्ण शून्य! अधिकाऱ्यांची सतत टाळाटाळ! दोषींना वाचवण्याचा संशय तीव्र! गावकऱ्यांचा संताप फुटला — पोलिस स्टेशनमध्ये धडक!
रस्त्यातून जाणाऱ्या अनेकांची वाहने नुकसानग्रस्त, मोबाईल तुटले, अपघाताच्या घटना वाढल्या…
मग गावकरी थेट वाढवण पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि म्हणाले—
“गुन्हा दाखल करा! ठेकेदार, PWD अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करा!”
पण तिथेही धक्काच!
पोलिसांचं उत्तर: “हा गुन्हा आम्ही नोंदवू शकत नाही… कोर्टात जा!”
जनता हादरली.
गावकऱ्यांचा सवाल —
“भ्रष्टाचाराला संरक्षण आणि जनतेला कोर्टाचे दरवाजे ठोठवायला लावा? गरीब जनता कोर्टात कसं लढणार? मग भ्रष्ट लोकांना कोण रोखणार?”
रस्त्याच्या भ्रष्टाचाराचा ‘मेगा स्कॅम’ उघड; गावकरी बंडासाठी सज्ज!
गावकऱ्यांचे गंभीर आरोप:
निकृष्ट काम असूनही अधिकाऱ्यांनी डोळेझाक ठेकेदार–अधिकारी यांचं संगनमत. तक्रारी असूनही एकाही अधिकाऱ्याने साइट तपासणी नाही
अर्जांवर वारंवार दुर्लक्ष
गावकऱ्यांच्या नुकसानीकडे पूर्ण पाठ फिरवली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार यांना प्रत पाठवूनही ‘संपूर्ण शांतता’! इतक्या वरिष्ठ पातळीवर तक्रार गेल्यावरही एकही चौकशी सुरू नाही…
दोषी अजूनही मोकाट…
प्रशासन शांत…
यामुळे गावकऱ्यांचा निषेध उफाळला आहे. गावकऱ्यांचा जाहीर इशारा:
“आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहिलो आहोत. आवश्यक असेल तर आंदोलन, कोर्ट, मीडियाची मदत—सगळं करू. पण हा भ्रष्टाचार दाबून बसणार नाही!”
हा फक्त रस्त्याचा प्रश्न नाही… हा जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे!
✔ अधिकारी झोपेत
✔ ठेकेदार मोकाट
✔ पोलिस हात वर
✔ प्रशासन मौन
तेव्हा जनता रस्त्यावर उतरते—आणि हा दिवस लांब नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.



