७ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे एकत्रित ‘वंदे मातरम’ गायन, राष्ट्रभक्तीचा अद्भुत संगम!

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- ०९-११-२०२५
लातूर:- “वंदे मातरम” आपल्या मातृभूमीच्या प्रति अपार प्रेम, त्याग आणि अभिमान यांचे प्रतीक असलेले हे गीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान राहिले आहे. राष्ट्रभावना चेतवणारे हे गीत प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात आजही देशभक्तीचा जाज्वल्य दीप प्रज्वलित करते.
आज भारतीय जनता पक्ष, लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने ‘वंदे मातरम’च्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य समूहगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ७ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या आणि देशभक्त लातूरकरांच्या एकत्रित गायनाने संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेला. “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय”च्या सामूहिक घोषणांनी आणि देशप्रेमाच्या उत्कट भावनेने वातावरण भारावून गेले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरजी,जिल्हाध्यक्ष मा.अजितभैय्या पाटील कव्हेकर लातूर शहर जिल्हा निवडणूक प्रमुख डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकरजी , आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. मोटेगवकर सर, विद्याआराधना क्लासेसचे संचालक प्रा.सतीश पवारजी , आयआयबी क्लासेसचे संचालक प्रा.निळकंठ मीरकलेजी ,संजय लड्डाजी व गायिका आसावरी जोशीजी ,माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगेजी , सरचिटणीस प्रवीण कस्तुरेजी , निखील गायकवाडजी , रागिणी यादवजी , संजय गिरजी , व्यंकटेश कुलकर्णीजी , महिला मोर्चा अध्यक्षा शीतल मालूजी , मंडल अध्यक्ष निर्मला कांबळेजी , सुरेश जाधवजी , राहुल भुतडाजी , काकासाहेब चौगुलेजी , विशाल हावा पाटीलजी , रोहित पाटीलजी , सचिन सुरवसेजी , गोपाळ वांगेजी , राजकुमार गोजमगुंडेजी , ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष प्रमोद गुडेजी , सुरेश राठोडजी , श्रीकांत रांजणकरजी , प्रा.उदय देशपांडेजी , दिपक मठपतीजी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




