उंडाळे येथे ५० % टक्के सवलतीत स्कूटर सायकल व वॉटर पुरिफायर स्टॉल उद्घाटन सोहळा संपन्न.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २१-११-२०२५
कराड:- उंडाळे ता.कराड येथे, भाजपा सोशल मीडिया सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील यांच्या वतीने तमाम जनतेसाठी पहिल्यांदाच 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप स्टॉलचे उदघाटन विधान परिषद मा.आमदार मा.श्री.आनंदरावजी पाटील (नाना) व य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मा.श्री.श्रीरंग देसाई (तात्या) यांच्या हस्ते करण्यात आले.
पंकज पाटील यांचे कार्य कौतुकास्पद यावेळी मा.आनंदराव पाटील (नाना) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उंडाळे विभागामध्ये, आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचे सामाजिक कार्य तळागाळात पोहचवण्याचे काम आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम, सर्व शासकीय योजना सर्वसामान्यान पर्यंत पोहचवून लाभ मिळवून देण्याचे काम आणि सवलतीच्या दरात ५०% ऑफर देऊन शाळेतील विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ यांना विविध वस्तू उपलब्ध करून देण्याचे काम मा.पंकज पाटील यांनी केले आहे. ते इतरही समाज उपयोगी कार्यक्रम नेहमी राबवत असतात व त्याचा फायदा सर्वासामान्यांना होतो. आत्तापर्यंत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवून देण्याचे काम केले आहे. असेच कार्य येथुन पुढच्या काळात सुरु ठेवावे. असे बोलून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रा.मा.बाजीराव शेठे (सर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या कार्यक्रमास आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. मा.पंकज पाटील यांनी उंडाळे भागामध्ये भाजपा पक्ष वाढवण्याचे काम व आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचे निष्ठेने काम करत या विभागात नवीन कार्यकर्ते जोडून गट वाढवन्याचे काम केले आहे, त्याचबरोबर सतत समाज हिताचे काही ना काही कार्यक्रम सर्वसामान्य जनतेसाठी राबवत असतात. त्यामध्ये ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी यांच्यासाठी ५०% सवलतीच्या दरात विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, सर्व शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून देण्याचे काम पंकज पाटील करत आहेत. इथून पुढे त्यांनी असेच आपले कार्य सुरु ठेवून, या विभागातील सर्व सामान्य जनतेसाठी काम करावे.
यावेळी डॉ.सुरेश पाटील (उंडाळे), मनव विकास सेवा सोसायटी चेअरमन मा.संताजी शेवाळे, टाळगाव मा.उपसरपंच मा.जयसिंगराव जाधव (तात्या), म्हासोली मा.सरपंच मा.आण्णासाहेब शेवाळे, येळगाव मा.विकास सेवा सोसायटी चेअरमन प्रा.मा.बाजीराव शेठे (सर), म्हासोली मा.सरपंच मा.दिनकरराव पाटील, साळशिरंबे मा.उपसरपंच मा.जयवंतराव यादव (आबा), ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे मा.संचालक मा.मारुती शेवाळे, म्हासोली विकास सेवा सोसायटी मा.व्हा.चेअरमन मा.उदय पाटील, टाळगाव विकास सेवा सोसायटी सदस्य मा.सागर जाधव, म्हासोली मा.ग्रा.पं.सदस्य मा.अमोल चव्हाण, मा.संभाजी शेवाळे (नाना), मा.धनाजी देशमुख, जिंती पोलीस पाटील मा.संतोष पाटील, मा.चंद्रकांत पाटील (बापू) मा.प्रकाश थोरात (सवादे), मा.उत्तम साळुंखे, मा.जगन्नाथ कोल्हे (आकाईचीवाडी), मा.बाबासो धुमाळ, उंडाळे भाजपा बुथ अध्यक्ष मा.अशोक पाटील, मा.प्रमोद पाटील, उंडाळे भाजपा बुथ अध्यक्ष मा.काशिनाथ पाटील, साळशिरंबे भाजपा बुथ अध्यक्ष मा.जयकर पाटील, टाळगाव भाजपा बुथ अध्यक्ष मा.रवींद्र सपकाळ, मा.राहुल पाटील, मा.महेंद्र यादव, टाळगाव भाजपा बुथ अध्यक्ष मा.वैभव जाधव, शेवाळेवाडी भाजपा बुथ अध्यक्ष मा.सागर शेवाळे, मा.मंगेश पाटील, मा.निलेश यादव, मा.अमोल शेवाळे इत्यादी उपस्थित होते.




