सत्कार समारंभ
आ. अतुल बाबा भोसले त्यांच्या हस्ते उंडाळे येथे विविध वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २०-११-२०२५
कराड:- उंडाळे तालुका कराड येथील आमदार अतुल बाबा यांच्या सहकार्याने व सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष माननीय पंकज पाटील यांच्या पुढाकाराने विविध वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन गुरुवार दिनांक २०-११-२०२५ रोजी उंडाळे येथे सायंकाळी ५.०० वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.
सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या वतीने नागरिकांसाठी पहिल्यांदाच ५०%सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कूटर, वॉटर फिल्टर, रेंजर सायकल ,वाटप करण्यात येणार आहे. या वस्तूंचे वाटप बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी होणार आहे. त्यामुळे उंडाळे विभागातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या उपक्रमामुळे माननीय पंकज पाटील यांचे सर्व ठिकाणी कौतुक केले जात आहे.




