लाल मातीतील हिरा पैलवान तानाजी चवरे ( आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त साळशिरंबे येथे जंगी कुस्ती मैदान.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- १२-११-२०२५
कराड:- महाराष्ट्र मध्ये कुस्ती क्षेत्रात नावलौकिक व अनेक पुरस्कारांचे मानकरी असणारे श्री पैलवान तानाजी चवरे (आप्पा ) यांचा वाढदिवस १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आहे. आप्पांच्या वाढदिवसानिमित्त साळशिरंबे येथे जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे.कराड कुस्ती संघ व कला क्रीडा सांस्कृतिक या ट्रस्टच्या माध्यमातून कुस्ती संघटना कराड तालुक्यात पुनर्जीवित करण्याचे काम आप्पांनी केले. कोरोना काळातील कुस्ती क्षेत्रात उभारी आणण्याचे योगदान त्यांनी केले.
दरवर्षी कुस्ती मैदान गुणगौरव व सन्मान सोहळा कर्तुत्वान नागरिकांचा या मैदानातत होत असते.साळ शिरंबे येथील कुस्ती मैदानात कराड तालुका आदर्श पैलवान पुरस्कार २०२५ मध्ये अक्षय मोहिते (बेलवडे), चैतन्य कणसे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी (RTO), रमेश गर्जे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी (सायबर पोलीस अधीक्षक सातारा), विलास देशमुख, हरिभाऊ साठे, बाबासाहेब तोरणे, प्रज्ञेश चवरे, सत्यम पाटील, अजिंक्य पाटील दिनकरराव थोरात, अमोल पाटील यांचा गुणगौरव सन्मान सोहळा कुस्ती मैदानात पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ कुस्ती निवेदक पैलवान शंकर पुजारी यांना महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कुस्ती मैदानासाठी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार श्री अतुल बाबा भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे, शिराळा मतदार संघाचे आमदार श्री सत्यजित देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सम्राट महाडिक, दत्तात्रय देसाई, विराज नाईक, हर्षवर्धन मोहिते, संतोष वेताळ, आप्पासाहेब कदम, धनंजय पाटील, संजय शेवाळे, ऋतुराज काळे ,दीपक पाटील ,पैलवान माऊली उबाळे ,बाळासाहेब पाटील ,मारुतीराव नलावडे, संदीप खोचरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साळशिरंबे येथील कुस्ती मैदानात मैदानात प्रसिद्ध निवेदक चंद्रकांत कोकाटे , ज्येष्ठ कुस्ती निवेदक ईश्वरा पाटील, श्री जाधव चिंचोली यांचा आवाज घुमणार आहे. या वाढदिवसानिमित्त कुस्ती संघटक पैलवान तानाजी चवरे (आप्पा) वाढदिवस उत्सव कमिटी व कराड तालुका कुस्ती संघटना यांच्यातर्फे कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कुस्ती शौकिनांना आव्हान करण्यात येत आहे आपणही कुस्ती मैदानाला भेट देऊन शोभा वाढवावी.




