दुःखद निधन
कै. शालन आत्माराम लामणे यांचे अल्पशा आजाराने निधन.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- ०९-११-२०२५
कराड:- जिंती तालुका कराड येथील प्रवीण लामणे यांच्या मातोश्री कै.शालन आत्माराम लामणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तसेच संजय तुकाराम लामणे यांच्या त्या काकी आहेत.जिंती गावची सून म्हणून त्यांनी आत्माराम लामणे यांना वैवाहिक जीवनात सुखदुःखात साथ दिली. मुलांचे संगोपन करून त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांच्या कुटुंबात पाठीमागे पती, मुलगा प्रवीण , सून, मुलगी सुनीता आणि नातवंड असा परिवार आहे. रक्षा विसर्जन कार्यक्रम सोमवार दिनांक १०-११-२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता जिंती वैकुंठ भूमी येथे होणार आहे.
स्त्री आपल्या कुटुंबात पाठीराखा सारखी उभी असते. मायेचा ताठ कना असते. कुटुंबाला प्रेम देणारे स्त्रीच असते. अशा जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. कुटुंबाला या दुखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!




