“जे एस डब्लू ऍस्पायर डोलवी प्रकल्पांतर्गत जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात संपन्न.”

दैनिक झुंजार टाईम्स
रायगड जिल्हा प्रतिनिधी:- कैलासराजे घरत
दिनांक:- ०१-१०-२०२५
पेण:- जे एस डब्लू व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग व पेण या तालुक्यामधील २६ शाळांमध्ये ऑगस्ट २०२४ पासून जे एस डबल्यू ऍस्पायर हा उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमामार्फत जीवन कौशल्य, गणित व भाषा या विषयांचे पायाभूत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून जोहे, दादर, जिते व कुसुंबळे या शाळा आणि गावांमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील सुमारे ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आयोजित सर्व कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देता आला. मुलांनी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा, तसेच रॅली काढून या दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या जोहे गावातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्या शाळेचे माजी विद्यार्थी शुभम मोकल यांनी स्वच्छेने बक्षीस दिली तर दादर शाळेतील विद्यार्थ्यांना तेथील शिक्षकांनी पुरस्कृत केले.
या कार्यक्रमामध्ये मध्ये विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पालक, शिक्षक यांनी आनंदाने उपस्थिती दाखवून आपले अनुभव व मत मांडले. शिवाय प्रोजेक्टच्या प्रगतीसाठी सहकार्याचे आश्वासनही दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बसच्या क्लस्टर मॅनेजर डॉक्टर प्रगती पाटील, सहकारी मेघा, पूजा, निकिता, संपदा, पंकज, दर्शना, मीनल, निताशा, सिद्धार्थ व कम्युनिटी कॉर्डिनेटर यांनी विशेष प्रयत्न केले.




