सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण सचिन किसन गावंड “रायगड विशेष सन्मान-२०२५” पुरस्काराने सन्मानित..!

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:-:खारपाडा पेण प्रतिनिधी
दिनांक:- ०३-१०-२०२५

रायगड:- सिनेअभिनेते डॉ.राजू पाटोदकर व आवाज महामुंबईचा चे संपादक श्री.मिलिंद खारपाटील साहेब, चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सचिन किसन गावंड(दुरशेत-पेण) यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र शाल आणि श्रीफळ देऊन पागोटे-उरण येथे सन्मानित करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा रायगड विशेष सन्मान पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यास शिवराज अनंत पार्टे माजी नगर सेवक पोलादपूर, महेश कडू माजी सरपंच सोनारी, मेघनाथ तांडेल (माजी अध्यक्ष पागोटे, भार्गव पाटील माजी सरपंच पागोटे, सुजित तांडेल (माजी उप सरपंच पागोटे), विठ्ठल ममताबादे (चाईल्ड केअर संस्था मीडिया सल्लागार) उपस्थित होते. सदर सन्मान सोहळा प्रसंगी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे विकास कडू (संस्थापक अध्यक्ष ),विक्रांत कडू (कार्याध्यक्ष ), विवेक पाटील (अध्यक्ष), मनोज ठाकूर (कार्याध्यक्ष), प्रकाश ठाकूर (सचिव),कैलासराजे घरत (पेण तालुका अध्यक्ष),विनायक म्हात्रे पनवेल अध्यक्ष), हितेश म्हात्रे (उपाध्यक्ष),राजेश ठाकूर (उपाध्यक्ष), हितेश म्हात्रे (उपाध्यक्ष ),तुषार ठाकूर(सहचिटनिस),ह्रितिक पाटील (सहचिटनीस),भूषण भोईर, उद्धव कोळी, विश्वनाथ घरत, सचिन गावंड(सहसचिव ), रिया कडू, विवेक कडू, आदित्य पारवे आदी
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण श्री.सचिन किसन गावंड हे गेली १० ते १२ वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी कार्य करीत आहेत. त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य उत्कृष्ठ आहे.
१) स्कील इंडिया ने चालवलेल्या प्रकल्पात दोन वर्ष शिक्षक
म्हणून काम केले आहे
२) ग्रामसवर्धन संस्थेतर्फे होणाऱ्या बऱ्याच आंदोलनात सहभाग.
३) संविधान दिनानिमित्त पथनाट्य मध्ये सहभाग घेतला.
४) स्वखर्चाने नेत्राशिबिर भरवून ७७ लोकांचे डोळे चेक व ९ लोकांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया.
५) खारेपाट विभागामध्ये उपोषणास समर्थन व भेट.
६) JSW विरोधात भूमिपुत्रांच्या लढ्यात सहभागी.
७) सोसायटी च्या टेरेसवर योगासने व सूर्यनस्कार वर्ग विनामूल्य चालू केले
७)करोना मध्ये समुपदेशन केले.
९) गावातील मुलांना स्पर्धा परीक्षा ना बसवून दोन वर्ष विनाशुल्क शिकवले.
10१९) आपटा येथे झालेल्या बालसंस्कार व योगा शिबिरात मुलांना योगासने शिकवली.
११) शाळेत स्वखर्चाने गडकोट संवर्धन कार्यक्रम.
सामाजिक कार्याबद्दल मिळालेले पुरस्कार :-
१) मोरेश्वर भगत सामाजिक संस्थेतर्फे पुरस्कार
२)जिल्हा परिषदे तर्फे संस्थेस पुरस्कार.
३) कोकणदीप मासिकाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार
४) प्रियदर्शनी फाउंडेशन तर्फे रत्नदीप पुरस्कार.
त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड यांच्या तर्फे “रायगड विशेष सन्मान-२०२५” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार नातेवाईक यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शुभेच्छा देत आहेत. त्यांच्याकडून यापुढेही अशीच निरंतर
शैक्षणिक कार्य आणि समाज सेवा घडत राहो हीच सदिच्छा. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




