सत्कार समारंभ

चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत “रायगड विशेष सन्मान-२०२५” पुरस्काराने सन्मानित..!

"सर्वच स्तरातून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव" या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विकास कडू साहेब, अभिनेते डॉ.राजू पाटोदकर व आवाज महामुंबईचा चे संपादक मिलिंद खारपाटील यांच्या हस्ते पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांना ट्रॉफी प्रमाणपत्र शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

दैनिक झुंजार टाईम्स 

राजपाल शेगोकार:- प्रतिनिधी 

दिनांक:- ०१-१०-२०२५

पेण:-  तालुक्यातील खारपाडा गावातील एक युवा नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, राज्यस्तरीय व्यसनमुक्तीदुत, सामाजिक कार्यकर्ते, युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन (एनजीओ)संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन्मानित पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि उत्कृष्ठ पत्रकारिता कार्याची दखल घेऊन चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड यांच्या तर्फे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत

“रायगड विशेष सन्मान-२०२५” पुरस्काराने पागोटे उरण येथे

सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका अखंडपणे सुरूच आहे.

   राष्ट्रीय पुरस्कार:- 

१) महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार-२०२३

२) राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव सन्मान-२०२३

३) छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार-२०२४

४) नॅशनल एक्सलेंट अवॉर्ड-२०२४

५) श्री शिरोमणी संत रोहिदास महाराज राष्ट्रीय पुरस्कार-२०२४

राज्यस्तरीय पुरस्कार :- 

१) कोकणभूषण पुरस्कार-२०२३

२) समाजरत्न पुरस्कार-२०२३

३) छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार-२०२४

४) महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४

५) आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२४

६) अष्टगंध कलामंच उरण-पत्रकारिता पुरस्कार-२०२५

७) बहिरीनाथ कलाप्रेमी यू ट्यूब चॅनेल वतीने

    उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५

सन्मानिय कैलासराजे घरत एक उत्तम निर्भिड पत्रकार असून जनसामान्यांच्या समस्यांना, अन्यायाला आपल्या लेखणीच्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अपघात ग्रस्तांना उपचारासाठी मदत, शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य करणे असे कोणतेही क्षेत्र बाकी नाही. जिथे कमी तिथे आम्ही. त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या एका कार्यकुशल, हरहुन्नरी,अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा

“रायगड विशेष सन्मान-२०२५” पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल विविध राजकीय, विविध सामाजिक संघटना, डी वाय फाउंडेशन,भारतीय दलीत साहित्य अकादमी मुंबई, चाईल्ड केअर सामाजिक संस्था, माहीती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती दुष्मी-खारपाडा, रायगड स्वाभिमान वृत्तपत्र, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, पत्रकार मित्र, पदाधिकारी, आई एकवीरा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, अष्टगंध कलामंच उरण नवी मुंबई, राजे मित्रपरिवार, दुष्मी-खारपाडा ग्रामस्थ, मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दैनिक रायगड स्वाभिमान, दैनिक आधुनिक केसरी, महाक्रांती न्यूज २४, सारथी न्यूज, साप्ताहिक जन महाराष्ट्र न्यूज, साप्ताहिक वेध विकासाचा, महाराष्ट्र ग्रामीण न्यूज, पुरोगामी विचारांची झुंज, जनक्रांती न्यूज यामध्ये वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्षे काम करीत असताना समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जनजागृती तसेच अनेक मोर्चा उपोषण, धरणे आंदोलन यात सक्रिय सहभाग, अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते सक्रिय कार्यरत असून युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन(एनजीओ) या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजपयोगी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, वृक्ष संवर्धन, गडसंवर्धन स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नशामुक्ती, मधुमेह मुक्ती, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक म्हणून अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीसाठी गडकोट संवर्धन माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे गडाचे विविध भाग यांची माहिती देणे, सर्प जनजागृती व्याख्यानमाला, सुंदर सुवाच्च हस्ताक्षर पाठमाळा, शिवशंभूचरित्र इतिहास प्रश्नमंजुषा स्पर्धा, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा मार्गदर्शन शिबिर, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, इयत्ता १०वी १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स शिबिर, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संभाषण कौशल्य कार्यशाळा, इंग्लिश स्पीकिंग, थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button