महिला विशेष

चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे नवदुर्गांचा सन्मान पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

दैनिक झुंजार टाईम्स 

कैलासराजे घरत:- पेन प्रतिनिधी 

दिनांक:- ०१-१०-२०२५

रायगड:- चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे अनेक वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात त्यातील दर वर्षी दिले जाणारे नवदुर्गा सन्मान हा एक उपक्रम संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला जातो. तसेच या वर्षी हि नवदुर्गा सन्मान रायगड २०२५ हा पुरस्कार रायगड जिल्हातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना देण्यात आला. महिला पोलीस कनिष्का नाईक टाकीगाव- उरण, योग शिक्षिका प्रा. अपूर्वा अनिल देसाई महड-रायगड, सामाजिक कार्यकर्त्या प्रतीक्षा सचिन चव्हाण, शालेय सेविका शीतल शैलेश दर्णे, केगांव-उरण, समाजसेविका करुणा ईश्वर ढोरे पनवेल, गायिका कु.हदया सुदर्शन जाधव कळबूसरे उरण, संपादिका- पत्रकार सीमा प्रमोद मोरे पोलादपूर, अभिनेत्री निकिता सुरेश पाटील बोकडवीरा उरण, डॉ.वनिता श्रीकांत पाटील वैद्यकीय बोकडवीरा, उरण या रणरागिणींनीना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. या नवदुर्गाचे यथोचित मानसन्मान करण्यात आला. तसेंच या प्रसंगी रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा रायगड विशेष सन्मान पुरस्कार देऊन गुण गौरव करण्यात आले.  कैलासराजे कमलाकर घरत (पत्रकारिता/ सामाजिक क्षेत्र) खारपाडा पेण, प्रकाश ठाकूर निवेदक-धुतम उरण, सचिन किसन गावंड (शैक्षणिक क्षेत्र) दुरशेत पेण, भूषण दामोदर भोईर (नूत्य दिग्दर्शक )मोठी जुई उरण ,कु विनायक म्हात्रे (युट्युबर)पनवेल , उत्तमकुमार कडवे (गायक )करळ उरण, राजेश द्वारकानाथ ठाकूर(अभिनेता)भेंडखळ उरण, हितेश अशोक म्हात्रे (निवेदक)जसखार उरण, राजेश रामचंद्र चोघुले (सामाजिक कार्य), शिक्षक कुंडेगाव उरण ,विवेक गजानन केणी (गायक) चिरनेर उरण , रोशन घरत व भाग्यश्री घरत (अभिनय) खोपटे उरण , साहील कडू व परी कडू (संगीत /ब्लॉगर )सोनारी उरण , नितेश तांडेल व तेजस्वी तांडेल (युट्युबर )जसखार उरण यांचा रायगड विशेष सन्मान पुरस्कार २०२५ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद खारपाटील संपादक आवाज महामुबंई चैनल, डॉ राजू पाटोदकर सिने आभिनेते, शिवराज अनंत पार्टे माजी नगर सेवक पोलादपूर तसेच चाईल्ड केअर संस्थेला वेळोवेळी मदत करणारे महेश कडू माजी सरपंच सोनारी, मेघनाथ तांडेल (माजी अध्यक्ष पागोटे, भार्गव पाटील माजी सरपंच पागोटे, सुजित तांडेल (माजी उप सरपंच पागोटे), विठ्ठल ममताबादे (चाईल्ड केअर संस्था मीडिया सल्लागार) उपस्थित होते.सदर सन्मान सोहळा प्रसंगी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे विकास कडू (संस्थापक अध्यक्ष ),विक्रांत कडू (कार्याध्यक्ष ), विवेक पाटील (अध्यक्ष), मनोज ठाकूर (कार्याध्यक्ष), प्रकाश ठाकूर (सचिव),कैलासराजे घरत (पेण तालुका अध्यक्ष),विनायक म्हात्रे पनवेल अध्यक्ष), हितेश म्हात्रे (उपाध्यक्ष),राजेश ठाकूर (उपाध्यक्ष), हितेश म्हात्रे (उपाध्यक्ष ),तुषार ठाकूर(सहचिटनिस),ह्रितिक पाटील (सहचिटनीस),भूषण भोईर, उद्धव कोळी, विश्वनाथ घरत, सचिन गावंड(सहसचिव ), रिया कडू, विवेक कडू, आदित्य पारवे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक पाटील यांनी केले व निवेदन प्रकाश ठाकूर यांनी केले आणी आभार प्रदर्शन विकास कडू यांनी मानले. शेवटी विकास कडू यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले व नवदुर्गांचे तोंडभरून कौतुक केले.यावेळी पागोटे गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. नवदुर्गा सन्मान कार्यक्रम विकास कडू यांच्या संकल्पनेतून करण्यात आला.या चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड च्या उपक्रमास ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.या कार्यक्रमाला महेश कडू माजी सरपंच सोनारी यांनी संस्थेला आर्थिक मदत केली. या कार्यक्रमाबद्दल बोलताना चाईल्ड केअर सामाजिक संस्थाचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू बोलताना म्हणाले कि “नवदुर्गा सन्मान कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला आतिशय आनंद होत आहे कारण हा सन्मान नारी शक्तीचा सन्मान आहे या सन्मानाने रायगडच्या संपूर्ण नारीशक्तीचा सन्मान झाला आहे आणि यामुळे ९ महिला नव्हे तर हजारो स्त्रिया आप आपल्या क्षेत्रात उल्ल्खनीय कार्य करतील असे मनोगत व्यक्त केले

एकंदरीत चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे नवदुर्गांचा सन्मान सोहळा मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button