छत्रपती शिवाजी महाराज आणि भाऊबीज..! “छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण- बहीण मग ती कोणाची असो तिचा नेहमी आदर करा.”

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- खारपाडा पेण प्रतिनिधी
दिनांक:- २४-१०-२०२५
पेण:- शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाई गढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले, लढाई सुरू झाली. एक छोटीशी गढी.मावळे लढतायेत पण गढी काही मिळेना. एक दिवस गेला,आठ दिवस गेले,पंधरा दिवस, तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला आणि जिंकली कोण होते त्या गढीत?कोण लढल एवढे चिवटपणे? ती होती मल्लाबाई(सावित्री) देसाई ही लढवत होती ती गढी.गढी ताब्यात आली, सावित्री कैद झाली, राजे गढीत गेले. गादीवर स्थानापन्न झाले.आणि सावित्रीला समोर आणले गेले ती घाबरलेली, गांगरलेली आता माझं कस होणार? तिला एक लहान मुल होत. त्याची काळजी लागली. मला शिवाजी राजा मारणार. माझ बाळ अनाथ होणार. आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली.महाराज मला मारा, ठार मारा.पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या. हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला. तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली. बाळ आणले राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते.आता शिवराय माझ्या मुलाला मारणार, काय करावे? तेवढयात राजांनी आज्ञा दिली, सावित्रीला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका आणि या शञूच्या बाईसाठी शिवाजी राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ताई, कोण म्हटले मी तुम्हाला मारणार! या बाळाला मारणार ! मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला. आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय, काही तरी दिले पाहिजे ना?
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडीसाठी असे म्हणून राजांनी ते बाळ सावित्रीबाईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले. तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते.पण मगाशी दुःखाने येणारे अश्रू आता आनंदाने वहायला लागले.
शिवराय निघुन गेले.पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले. यात गादीवर शिवराय बसलेले आहेत. लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अखंड सेवेचे ठायी तत्पर शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक पत्रकार कैलासराजे घरत निरंतर




