वरिष्ठ पत्रकार, संपादक तथा साहित्यिक गणेश कोळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.

दैनिक झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:-राजपाल शेगोकार.
दिनांक:- ३१-१०-२०२५

पनवेल:- श्रीक्षेत्र एकविरा आई मंदिर भगतवाडी सुकापुर सिमरन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व विश्वस्त व्यवस्थापक पत्रकार प्रमोद मधुकर भगत यांनी एकविरा आई मंदिरामध्ये वरिष्ठ पत्रकार संपादक तथा साहित्यिक मा. गणेश कोळी यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. या कार्यक्रमाला पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे तसेच पत्रकार सचिन भोळे, लालचंद यादव, स्वप्निल दुधारे, दत्तात्रय कुलकर्णी, शंकर वायदंडे, देवांशीस, व पुरोगामी पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हा सचिव व शिवधर्म वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक तसेच दैनिक झुंजार वार्ता वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक, राजपाल शेगोकार तसेच सुकापुर पालीदेवद ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती रवींद्र केणी तसेच सुकापुर ग्रामपंचायत सदस्या पूनम ताई प्रमोद भगत, रवींद्र केणी, अनिकेत शेगोकार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतनाचा हा कार्यक्रम मोठा थाटामाटात संपन्न झाला.
वरिष्ठ पत्रकार मा. गणेश कोळी यांनी आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करत असताना त्यांचं मन अगदी भारावून गेले. पुढे बोलताना सांगितले की आज मी खूप आनंदी आहे. प्रमोद शेठ भगत यांनी माझा वाढदिवस आई एकवीरा देवीच्या मंदिरात साजरा केला व आई एकविरा देवीची कृपा व आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहो अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच पनवेल तालुका प्रेस क्लबचे सर्व पत्रकार मंडळी यांनी येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व इतर मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे खूप आभार मानले. माननीय पत्रकार प्रमोद शेठ भगत हे आई एकवीरा देवी ह्या संस्थेचे विश्वस्त व्यवस्थापक असून गेले पाच वर्षापासून आई एकवीरा देवीच्या नावाने दर गुरुवारी अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे म्हणून त्यांनी दर गुरुवारी आई एकवीरा देवीच्या मंदिरात गोरगरीब जनतेला अन्नदान करतात. यासाठी ते कुठलीही बाहेरची मदत न मागता स्वतःच्या स्वखर्चाने हे अन्नदान दर गुरुवारी करत असतात. ते असे बोलतात की मी जिवंत असेपर्यंत हे अन्नदान मी करतच राहीन,
अन्नदान करत असताना मला याचा खूप मोठा आनंद होतो व लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा मी बघतो तेव्हा त्यांचा आनंद तोच माझा आनंद अशी भावना होते. सर्वांच्या साक्षीने एक प्रयत्न समाजासाठी.




