रिपाईच्या प्रयत्नामुळे अखेर जीर्ण झाडावर कारवाई.

दैनिक झुंजार टाईम्स.
महेंद्र माघाडे. वार्ताहर नवीमुंबई.
दिनांक:- ३०-१०-२०२५
पनवेल, कामोठे:- तुलसी ज्वेलर्स, सेक्टर १९ कामोठे येथील पादचारी मार्गाशेजारी असलेले एक मोठे झाड दीर्घकाळापासून जीर्ण अवस्थेत होते. हे झाड मोडकळीस आल्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांमध्ये होती.
या ठिकाणी सतत रहदारी सुरू असते, तसेच जवळच गोकुळ डेअरीचे रिक्षा स्टँड आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची बाकडे असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता.
नागरिकांच्या या तक्रारीला रिपब्लिकन पक्षाचे पनवेल तालुका युवक अध्यक्ष आयु. आशिष आत्माराम कदम यांनी गांभीर्याने घेतले. त्यांनी दिनांक २४/०९/२०२५ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने झाडावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अखेर त्या जीर्ण झाडावर आवश्यक ती कारवाई केली.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल आयु. आशिष आत्माराम कदम तसेच पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.





