राजकारण

आशिष आत्माराम कदम रिपाईतर्फे पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक.

कामोठेतील लोकप्रिय समाजसेवक आशिष आत्माराम कदम रिपाईतर्फे पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक.

दैनिक झुंजार टाईम्स. 

महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी.

दिनांक:- २६-१०-२०२५

 

नवीमुंबई:- आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत कामोठे परिसरातून रिपब्लिकन पक्षाचे पनवेल तालुका युवक अध्यक्ष आशिष आत्माराम कदम हे उमेदवार म्हणून आपली तयारी दर्शवत असून, स्थानिक नागरिकांच्या पसंतीचे केंद्रबिंदू ठरत आहेत.

गेल्या अठरा वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहून त्यांनी समाजकार्यात भरीव कामगिरी केली आहे. विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत राहून कदम यांनी समाजातील प्रश्नांवर आवाज उठवला आहे. रिपब्लिकन पक्ष, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ८०१, सम्यक बहुदेशीय संस्था, संघर्ष युवा मंच आणि नालंदा बुद्ध विहार कामोठे या संघटनांमध्ये त्यांचे प्रभावी नेतृत्व ओळखले जाते.

स्थानिकांच्या मते, आशिष कदम हे सर्वांशी सुसंवाद साधणारे, हसतमुख, मनमिळावू व आदरपूर्वक वागणारे सुशिक्षित, प्रामाणिक व समाजाभिमुख कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच त्यांचा कामोठेचा भावी नगरसेवक म्हणून विचार स्थानिक नागरिक करत आहेत.

समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून सेवा देणारे कदम हे तरुण नेतृत्वाचे उत्तम उदाहरण ठरत असून, त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि संघटन कौशल्य पाहता कामोठेच्या विकासात त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल, असा नागरिकांचा विश्वास आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button