प्रस्थापित ओबीसीचा “माधव पॅटर्न” आणि मराठा कुणबीकरण वादात खऱ्या ओबीसी विकास वंचित बलुतेदार विश्वकर्मा समाजाला न्याय कधी?
ओबीसी आरक्षणाचे खरे हक्कदार असलेल्या विश्वकर्मा, बलुतेदारांच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर लक्ष्यवेधी आंदोलन.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- ३०-१०-२०२५
मुंबई:- दि. २८ ऑक्टोबर,मंगळवार रोजी आझाद मैदान,मुंबई येथे *लक्ष्यवेधी आंदोलनाच्या* माध्यमातून राज्यातील ओबीसी विश्वकर्मा, बलुतेदार समाजाच्या आरक्षण व ४० वर्षापासून प्रलंबित मागण्यावर शासनाचे लक्ष्य वेधण्यात आले.
मंडल आरक्षणाच्या अंमलबजावणीनंतर मागील ३० वर्षापासून ओबीसी आरक्षणातील मायक्रो ओबीसी, बलुतेदांराच्या विश्वकर्मा समाज, बलुतेदार घटकांच्या पर्यंत आरक्षणाचे लाभ पोहचले नाहीत. आजवरच्या कोणत्याही सरकारने आरक्षणाचे सर्वेक्षण व पुनर्रचना या कायदेशीर बाबीची अंमलबजावणी केली नसल्याने ओबीसी आरक्षणाचा लाभ हा संख्येने प्रबळ व राजकीय प्रथापित असलेल्या मोजक्याच जातींना झाला. मंडल आरक्षणाच्या निकषानुसार खरे हक्कदार असलेल्या पारंपरिक बलुतेदार घटनांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीचे कोणतेही धोरण राज्यकर्त्यांनी अवलंबविले नाही.
मराठा समाजाच्या आंदोलन व सरकारच्या धोरणामुळे सध्या राज्यात २ कोटी मराठा समाज ओबीसीमध्ये दाखल झाला आहे, तर आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी स्वयंघोषित ओबीसी नेत्यांमध्ये स्पर्धा रंगलेली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो जातीय द्वेषाचा संघर्ष उभा केला गेला आहे याचे सर्वाधिक परिणाम हे गावगाड्यातील बलुतेदार अल्पसंख्याक समाजावर होत आहेत. ओबीसींच्या नावावर होणाऱ्या सभेमध्ये केवळ दारिद्रय दाखविण्यासाठी सुतार,लोहार, न्हावी, कुंभार,धोबी या लहान सहान जातीचे नाव घेतल्या जात असले तरीही स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवून घेणाऱ्या व प्रत्येक सरकारमध्ये सहभागी असलेल्या राजकारण्यांनी बलुतेदारांच्या आर्थिक महामंडळ, शैक्षणिक सवलती व सामाजिक न्यायासाठी कोणतीही भूमिका घेतलेली नाही, तर ओबीसी आरक्षणाचे खरे हक्कदार असलेल्या विश्वकर्मा समाज, बलुतेदारांना गृहितच धरले जात आहे.
प्रमुख मागण्या
▪️महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मागासवर्ग कायदा २००५, नुसार OBC २७% च्या आतच ५% चा वेगळा उपवर्ग तयार करून करून विश्वकर्मा बलुतेदारांना हक्काचे आरक्षण देण्यात यावे करण्यात यावे
▪️ विश्वकर्मा बलुतेदारांच्या व्यावसायिक व कौशल्यविकासाठी सारथी,महाज्योती प्रमाणे विश्वकर्मा कौशल्यविकास व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी
▪️ओबीसी विभागांतर्गत विश्वकर्मा बलुतेदारांसाठीच्या उपकंपनी आर्थिक विकास महामंडळाचे संचालक पदी प्रतिनिधित्व व २०० कोटी रुपयाचा आर्थिक निधी देण्यात यावा
▪️असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियमानुसार पारंपरिक कारागिरांसाठी विश्वकर्मा असंघटित कामगार मंडळ स्थापन करण्यात यावे
▪️राजकीय प्रतिनिधित्व नसलेल्या व अल्पंख्याक असलेल्या बलुतेदार समाजासाठी विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे.
लक्ष्यवेधी मुद्दे
# महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आणि कायदेशीर निकषातील मागण्यांवर शासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर जानेवारी मध्ये आझाद मैदानावर हजारो सुतार,लोहार, कुंभार,न्हावी कारागिरांचे बलुतेदांराच्या पारंपरिक व्यवसायासह पाल ठोकून बेमुदत आंदोलन करण्यात येईल. असे मत विश्वकर्मा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पांचाळ यांनी मांडले
# प्रस्थापित ओबीसी नेते केवळ मेळाव्यातून गरिबी दाखविण्यासाठीच सुतार,लोहार,न्हावी, कुंभार अशा जातीचा वापर करतात पण आजपर्यंत कधीही बलुतेदारांचे प्रतिनिधित्व देत नाहीत.
विश्वकर्मा बलुतेदारांच्या सामाजिक न्याय लढ्याला सकल मराठा समाजाचा पाठिंबा असेल असे मत आंदोलनाला भेट देऊन मराठा आंदोलनाचे नेते योगेश केदार यांनी समर्थन दिले.
# ओबीसींना धक्का लावल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, सरकार व स्वयंघोषित ओबीसी नेते हे समाजाची दिशाभूल करत आहेत. ओबीसी आरक्षणाचे वर्गीकरण करून आरक्षणाची पुनर्स्थापना केल्याशिवाय खऱ्या ओबीसीतील मागास,वंचित घटकांना न्याय मिळणार नाही. विश्वकर्मा बलुतेदारांच्या सामाजिक आंदोलनासाठी आमचे समर्थन असेल असे मत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले.




