“ए” विभागाचे कनिष्ठ अभियंता संतोष सोनवणे यांची बदली, कामगारांतर्फे सत्कार समारंभ.

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- प्रतिनिधी
दिनांक:- ०६-१०-२०२५
मुंबई:- बृहन्मुंबई महानगरपालिका नेहमीच विविध कारणाने देशाचे लक्ष वेधून घेत असते. यावेळी अधिकारी आणि कामगार यांच्यातील गोड नात्यामुळे चर्चेत असल्याचे दिसते. ए वॉर्डमधील मलनि:सारण खात्याचे कनिष्ठ अभियंता संतोष सोनवणे यांची दुसऱ्या विभागात बदली झाली आहे. सोनवणे यांची बदली झाल्याची गोष्ट कामगारांना कळताच त्यांच्या शेवटच्या दिवशी त्यांचा सत्कार करण्याचे ठरवण्यात आले.
मलनि:सरण खात्यातील रामपार्ट चौकीच्या कामगारांनी सोनवणे यांच्या प्रेमापोटी सत्काराचे आयोजन केले. यावेळी डी.ए सोलंकी डी.ए भोईर व डी.ए गोंधडे यांनी पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देऊन सोनवणे यांचा सत्कार केला. मुकादम सुरेश रोकडे यांनी सोनवणे यांचा स्वभाव, कार्य करण्याची पद्धत आणि कामगारांसोबत असलेल्या नात्यावर भाष्य करत तोंडभर कौतुक केले.
आपले मनोगत व्यक्त करत असताना कामगारांनी अनपेक्षितपणे केलेल्या सत्कारामुळे सोनवणे भावुक झाल्याचे दिसले. ” सर्वच अधिकारी, कामगार, कर्मचारी वर्गाने नेहमीच सहकार्य केले” असल्याचे सोनवणे बोलत होते. शेवटी कामगार, अधिकारी सर्वांचे आभार व्यक्त करत चौकीतील कामगारांशी गळाभेट घेऊन थेट एफ/साऊथ परळ येथे त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रवाना झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर व तांडेल यांनी पार पाडले.
विक्रांत_
8591440420




