सण उत्सव

फटाका असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज मंत्री व धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून “अनाथ मुला-मुलींची अनोखी दिवाळी.”

फटाका असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज मंत्री व धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून “अनाथ मुला-मुलींची अनोखी दिवाळी” हा उपक्रम यंदा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत ना. हेमंतभाऊ पाटील व आ. आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते ६० अनाथ मुला-मुलींना फटाके, नवीन कपडे आणि मिठाई वाटप करण्यात आले.

दैनिक झुंजार टाईम्स 

राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी 

दिनांक:- २०-१०-२०२५

लातूर:- “अनाथ मुला-मुलींची अनोखी दिवाळी” हा कार्यक्रम स्टेशन रोडवरील गुरुद्वारा मैदानावरील फटाका बाजारामध्ये पार पडला. या वेळी व्यासपीठावर सतीश शर्मा, रहाटे, संतोष मानधने, प्रतापसिंग खालसा, गुरु भाई, विशाल फाजगे, सुषमा हुरणे, सुरेश शर्मा, संतोष भारती, लालबाजी घाटे व दिनकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व मोत्याच्या माळेने सत्कार करण्यात आला. हा सत्कार धनराज मंत्री, आयुष मंत्री, गणेश मंत्री, अनिल मंत्री, सिद्धेश्वर पेटकर, महेश देबडवार, अनिकेत परदेशी, शुभम परदेशी, शुभम वट्टमवार, विशाल मुत्तेपवार, अजय ठाकुर, संदिप रायेवार, संजय गायकवाड, आनंद मुथा, शेख साद्दुला, शेख युसूफ, चिद्रावार, शेख अमजद, विजय मुथा व पियुष मंत्री यांनी केला.

प्रास्ताविकात धनराज मंत्री यांनी फटाका व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला. त्यावर ना. हेमंतभाऊ पाटील यांनी सांगितले की, “अनाथांची अनोखी दिवाळी हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. फटाका व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत मी स्वतः अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.”

आ. आनंदराव बोंढारकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “अशा उपक्रमांची गरज प्रत्येक ठिकाणी आहे. फटाका असोसिएशनच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन.”

या वेळी सुमन मुलींचे बालगृह व लहुजी साळवे अनाथ आश्रम, धनगरवाडी येथील मुलांना चांगल्या प्रतीचे नवीन कपडे, मिठाईचे डबे व मुबलक फटाके देण्यात आले.

कार्यक्रमाचे रंगतदार संचलन ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयुष मंत्री यांनी मानले.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अनपेक्षित पणे मिळालेल्या भेटवस्तूंमुळे अनाथ मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फटाका असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.उपस्थित सर्वांच्या चहा फराळा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. अनाथ मुलांसाठी आगळावेगळा उपक्रम राबवल्याबद्दल संयोजक धनराज मंत्री व ॲड. दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(छायाचित्र : करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, नरेंद्र गडप्पा, सचिन डोंगळीकर, धनंजय कुलकर्णी)

जाहिरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button