रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षात राजूर येथे विजयादशमीचे भव्य पथसंचलन.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- अहमदपूर प्रतिनिधी
दिनांक:- ०८-१०-२०२५
लातूर:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजूर शहरातून विजयादशमी निमित्त भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या पथसंचलनात शहरातील तसेच तालुक्यातील विविध गावांमधून स्वयंसेवक सहभागी झाले होते.
राजूर शहरातील श्री क्षीप्र गणेश मंदिरातून पथसंचलनास प्रारंभ झाला.महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, , ग्रामदेवता हनुमान मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वा. वी. दा. सावरकर चौक, थोडगा रोड मार्गे शिवपार्वती मंगल कार्यालय निजवंते नगर येथे शस्त्रपूजन करून उत्सवाची सांगता झाली.
या विजयादशमीच्या पथसंचलनात ५४० स्वयंसेवक गणवेशात तर २१६ नागरिकांनी नागरी वेशात उत्सवात सहभाग घेतला. एकूण ७५६ स्वयंसेवकांनी शस्त्रपूजन उत्सवात सहभाग नोंदवला. उत्सवाच्या अध्यक्षस्थानी नगरातील प्रतिष्ठित व्यक्ती टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. अशोकजी सांगवीकर उपस्थित होते,तर वक्ते म्हणून लातूर विभाग संपर्क प्रमुख मिलिंदजी बिलोलिकर यांचे मार्गदर्शन झाले.
तसेच किनगाव येथेही विजयादशमी निमित्त भव्य पथसंचलन आयोजित करण्यात आले. किनगाव येथील संचलनात सुमारे १५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. संचलनात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघशक्तीचा गौरव केला.कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला.




