दुःखद निधन

कालकथित भाउराव चोपडे यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम, कळंबोलीत दुःखात साजरा.

दैनिक झुंजार टाईम्स. 

महेद्र मघाडे. वार्ताहर. 

दिनांक:- ०६-१०-२०२५

कळंबोली पनवेल:- कळंबोली शहरातील आंबेडकर चळवळीतील सक्रिय ज्येष्ठ कार्यकर्ते व धम्मबंधु कालकथित भाऊराव चोपडे यांचे रविवार दिनांक २८सप्टेंबर रोजी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी आम्रपाली बुद्ध विहार कळंबोली येथे पार पडला.

कालकथित भाऊराव हरजी चोपडे (गुरुजी)

बौध्द धम्माचे गाढे अभ्यासक व धम्म चळवळीमध्ये सक्रिय असलेले गुरुजी..यांनी त्यांच्या जिवनामध्ये अनेक पदे भुषविले आहेत..उदा. श्रामनेर, बौध्दाचार्य व धम्म प्रचाराक व तसेच केंद्रीय शिक्षक व जेष्ठ नागरिक संघटना, कळंबोली सचिव म्हणुण पदभार सांभाळला..

त्यांचा पुण्यानुमोदनाच्या आयोजित कार्यक्रमात खुप मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्व मित्र परिवार व नातेवाईक, आप्तस्वकीय, सगेसोयरे, नेते या सर्वांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण/वाहीली केली व त्यांच्या जीवनाचा उलगडा करत त्यांचे योगदान,वेळेची शिस्त, व परिवारास सुशिक्षीत नव्हे तर संस्कृत केले.व त्यांच्या जाण्याने कळंबोलीकरांचा एक हिरा हरपला असुन त्यांची पोकळी निर्माण झाली आहे असे वक्त्यांनी आपल्या भाषणात म्हणुन श्रद्धांजली वाहिली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button