श्रद्धांजली

स्व. नामदेव कान्हाई पांडुरंग शिरढोणकर यांचे ८ वे पुण्यस्मरण सामाजिक कार्यातून संपन्न.

पूर्वजांच्या लोकसेवेचा ,क्रांतिचा वारसा विजय शिरढोणकर पुढे नेत आहेत...भूषण कडू 

दैनिक झुंजार टाईम्स 

साबीर शेख:- उलवे प्रतिनिधी 

दिनांक:- ०९-०९-२०२५

नवी मुंबई:- शिवभुमीचे आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक, समाजसेवक, वारकरी, वृक्षमित्र तसेच आद्य क्रांतीकारकांचे खरे समर्थक स्व. नामदेव कान्हाई पांडुरंग शिरढोणकर यांचे ०८ वे पुण्यस्मरण समाज उपयोगी कार्यातून मोठ्या श्रद्धाभावानेतून करण्यात आले.स्व. नामदेव गुरुजी स्वातंत्र्य सैनिकांच्या ,क्रांतिकारकांच्या परिवारातील असून त्यांच्या जीवनातील कार्याची महंती आज ही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अजरामर ठेवत त्यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त श्री. नांदाई माता मंदिर तरघर येथे पूजा अर्चना करून त्या ठिकाणी अनेक जातींच्या झाडांची वृक्षारोपण करून प्रारंभ केला. त्यानंतर उलवे येथील स्व. दिं. बा .पाटील भूमिपुत्र भवन सभागृहात स्व.गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरां उपस्थितीत पूजन करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक बुवा म्हात्रे व गौरी बोधनकर यांच्या सुरेल आवाजात हरिनामाच्या गजरात भक्ती भावाने भजनवारी,सामाज प्रबोधन संगीताच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयावर कला सादर करण्यात आली. तसेच लोकप्रिय कवी ,सरकारी वकील अँड. यशवंत भोपी चालू दुनिया या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी मान्यवरांच्या लोक भावनेतून सवाल भूमिपुत्रांचा नवी मुंबई विमानतळाला नाव दि.बां.च देणार कधी?” या विषयावर गीतकार गायक एकनाथ माळी व पार्टी व गायक नाना गडकरी यांनी गायनातून

श्रीकांत मुंबईकर यांच्या आर्केस्ट्रा कलेतून मने जिंकली. कार्यक्रमास अभिनेते भूषण कडू यांनी शिरढोणकर यांच्या परिवाराचे विशेष कौतुक करत आदर्श पुण्यस्मरण दिन जगापुढे कसा असावा हे सांगत भारावून गेले .यावेळी वारकरी बांधव, स्थानिक मान्यवर व शिरढोणकर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button