पुरग्रस्त परिवारातील २५० शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्यचे वाटप.
"समाजसेवा फाऊंडेशन, पूनावळे, पुणे मार्फत व शिवा संघटना, लातूर यांच्या सहकार्याने मुक्रामाबाद व उदगीर तालुक्यात पीड़ित पुरग्रस्त परिवारातील 250 शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्यचे वाटप".

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २२-०९-२०२५
उदगीर:- दिनांक २१/०९/२५ रोजी मुक्रामाबाद व उदगीर तालुक्यातती गरजू शालेय मुलां-मुलींना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटत करण्यात आले .
सविस्तर वृत…. या वर्षाच्या पावसाळी मौसमात ,ऑगस्ट, सप्टेम्बर मध्ये ढगफूटी मुळे मुक्रामाबाद व उदगीर तालुक्यातील नांदेड़ जिल्हा सीमेवरील बोरगांव, धडकनाळ, हाळणी या गावात पूरामुळे शेती, घरे, रस्ते, जनावरे, पीके, यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरातील गरीब परिवारांची हालखीची स्थिति आहे. शासन स्थरावर कमी अधिक प्रमाणात मदत होईलच मात्र काही स्वयंसेवी संस्था, नी ही मदतकार्य केले आहे. पुढील कीमान वर्षभर तरी या भगातील जनतेची स्थिति सामान्य व्हायला वेळ लागणार आहे. या भागात अजुन खुप मदतीची गरज आहे. शिवा संघटनेच राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे आणि शिवा संघटनेचे लातूर चे जिल्हा अध्यक्ष अँड, (adv) विलास खिंडे यांनी या पुरग्रस्त भागाचा दौरा करुण, तेथील भीषण स्थिति ची पाहनी केली व या भगातील गरजु लोकांना मदत करण्यासाठी अवाहन केले. शिवा संघटनेने केलेल्या मदतिच्या अवाहनास प्रतिसाद देत पुणे येथील ” समाजसेवा फाऊंडेशन, पुणे या स्वयंसेवी संस्थेने शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अँड, विलास खिंडे यांना संपर्क करुण आमची संस्था या भागतील अत्यंत गरजू परिवारातील शालेय मुलांना मदत करण्यास तयार आहे असे सांगीतले. त्या प्रमाने या भागतिल लोकांशी संपर्क करुण. हाळनी मधील १, धड़कनाळ मधिल १, बोरगाव मधील २ आणि मुक्रामाबाद मधील १ अशा ५ शाळाची निवड केली. या ५ शाळेतुन अत्यंत गरजू परिवरातील शालेय मुलां – मुलींची यादी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून तयार करुण घेतली. ती यादी समाजसेवा फाउंडेशन पुणेला पाठउन दिली.
त्या प्रमाणे या संस्थेने नियोजन करुण. मदतकार्यासाठी २१/०९/२५ वार रविवार हा निश्चित केला. समाजसेवा फाऊंडेशनचे नागेश भींगोल, तोंडारकर, राजू पेठे, नरेंद्र रत्नपारखी, माणीक भोसले, दादा मगर, महावीर गरड, यांनी व त्यांच्या टीम ने अथक परिश्रम घेऊन ही मदत या भागापर्यंत पोहचवली आहे, कार्यक्रमादरम्यान अनेक विषयावर समाजसेवा फाऊंडेशन ने आपली मते मांडली ते मनाले की, आम्ही फक्त माध्यम आहोत, मदतीचा भाव शुद्ध असेल तर मदत करणारे हजारों हात पुढे येतात. फक्त निस्वार्थ भाव त्यात असला पाहिजे, मराठवाढ्यातील सर्व स्वयंसेवी संस्थानी या पीड़ित पुरग्रस्त भागतिल लोकांना यथाशक्ति मदत करन्याचे आवाहन त्यांच्या प्रतीनिधिनी, केले आहे.
या मदतकार्यक्रमात, संबधित गावातील प्रतिष्ठित नागरीक, मुख्याध्यापक,शाळाचे शिक्षक, उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी, मन्मथ सोनटक्के,ज्ञानेश्वर लासुरे, तोंडारकर,पवन तोंडारे, बालाजी सुबाने,बोरगांवकर, संतोष खंकरे, मंन्मथ खंकरे,राम खंकरे, मुक्रामाबाद यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.





