आपले सरकार केंद्र चालकांना मिळणारे कमिशन थकीत.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २०-०९-२०२५
मुंबई:- महाराष्ट्र सरकार तर्फे महा सेवा केंद्र अखंड महाराष्ट्रात चालवले जाते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे दाखले, सर्टिफिकेट, केवायसी अशा अनेक प्रकारचे कामे या ठिकाणी केले जातात. जून महिन्यातल्या ऍडमिशन च्या वेळी मुलांना लागणारे दाखले सर्वर बंद असल्यामुळे दाखले वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे ऍडमिशन होत नाही.
आपले सरकार केंद्र चालक रात्री उशिरापर्यंत थांबून सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. उदरनिर्वाह यावर अवलंबून असल्यामुळे महा सेवा केंद्र आयटी चे आपले सरकार केंद्र चालकांना थकीत असणारे कमिशन सुद्धा वेळ मिळत नाही मग त्यांनी पोट पाणी कशावर भरायचे? केंद्र चालकांचा पैसा नक्कीच जातोय कुठे? यासारखे अनेक प्रश्न निर्माण होतात.
ऐनवेळी जून महिन्यात मुलांचा ऍडमिशन आपले सरकार बंद केले तर नागरिकांची व मुलांची गैरसोय झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी वेळेवर केंद्र चालक यांना मिळणारे कमिशन देण्याची मागणी महाराष्ट्रातून आपले सरकार केंद्र चालकांकडून होत आहे.



