पाणंद रस्त्याच्या अतिक्रमणाची चौकशी करण्याचे जिल्हा अधिकाऱ्याचे आदेश.

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- खारपाडा पेण प्रतिनिधी
दिनांक :- २५-०९-२०२५
पेण तालुक्यातील खारपाडा गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तक्रार दाखल केलेल्या पानंद रस्ता सर्व्हे नंबर २८/३ येथील खारपाडा भगतनगर ते घोटमालवाडी या रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्य बळीराम पांडुरंग पाटील व बंधू यांच्या अतिक्रमणाबाबत व बेकायदा बांधकामाबाबत खारपाडा गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी मुख्य सल्लागार ॲड.मनोहर पुंडलिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या विविध ठिकाणी अर्ज, दावा व तक्रारी दाखल केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून माननीय जिल्हाधिकारी अलिबाग रायगड यांच्याकडे जी तक्रार दिली होती त्या तक्रार अर्जाची गांभीर्याने दखल माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाने घेऊन त्या अनुषंगाने त्यांनी एम.एम.आर.डी.ए. मुंबई यांना व तहसीलदार पेण यांना निर्देश दिले की या प्रकरणात तात्काळ चौकशी करून जर अतिक्रमण आणि बेकायदा बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यास कायदा नियम धोरणानुसार तात्काळ नियमोचित कार्यवाही करून अर्जदार यांस कळवावे, अशी माहिती खरी शेतकरी संघटनेचे मुख्य कायदेशीर सल्लागार ॲड मनोहर पुंडलिक पाटील यांनी आमचे वृत्त प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सप्रमाण दिली, याप्रसंगी शेतकऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून जोरदार घोषणा दिल्या, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो! जय जवान! जय किसान!! अशा घोषणांनी आसंमत निनादून गेला.





